आमदार महेश सावंत यांना दिलासा
सदानंद सरवणकर यांची याचिका फेटाळली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : माहीम विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार महेश सांवत यांच्या आमदाराकीला शिंदे गटाचे सदानंद सरवणकर यांनी निवडणूक याचिकेतून दिलेले आव्हान उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. ७) फेटाळून लावले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सावंत यांना दिलासा मिळाला आहे.
न्या. आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने सरवणकर यांच्या निवडणूक याचिकेवर मंगळवारी आपला निर्णय जाहीर केला. त्यानुसार न्यायालयाने सदानंद सरवणकर यांची निवडणूक याचिका फेटाळून लावली. सावंत यांनी माहीम मतदारसंघातून ५०,२१३ मतांनी विजय मिळवला, तर सरवणकर ४८,८९७ मतांनी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. या वेळी अमित ठाकरे यांना ३३,०६२ मते मिळाली होती. विधानसभा निवडणुकीदरम्यान माहीम मतदारसंघातील निवडणूक शिंदे गट, ठाकरे गट आणि मनसेसाठी प्रतिष्ठेची ठरली होती.
काय प्रकरण?
नोव्हेंबर २०२४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सरवणकर यांनी ही निवडणूक याचिका दाखल केली होती. सावंत यांनी त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेले सर्व फौजदारी खटले लपवून ठेवले आणि मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप सरवणकर यांनी केला होता. तसेच ही माहिती न देणे हे सावंत यांना अपात्र ठरवण्यासाठी आणि २०२४च्या माहीम विधानसभा निवडणुकीचे निकाल रद्द करण्यासाठी पुरेसे कारण असल्याचेही याचिकेत म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.