सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ : गेली पाच वर्षे महापालिकेच्या तिजोरीत अपेक्षित जमा पैशांपेक्षा अधिक उत्पन्न जमा होण्याचे बांधलेले अंदाज चुकीचे ठरत आहेत. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न जमा होण्याचा पायंडा यावर्षीदेखील पालिकेने राखला आहे. हीच री सत्ताधारी लोकप्रतिनिधींनीही ओढली आहे. गेल्यावर्षी चार हजार ४०८ कोटी जमा होतील, असा अंदाज होता; मात्र प्रत्यक्षात दोन हजार ३७५ कोटींपर्यंतच प्रशासनाला मजल मारता आली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्पही आभासी ठरणार असल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
महापालिका अधिनियमाचा दाखला देत सभागृह नेते सागर नाईक यांनी यंदाचा अर्थसंकल्प लोकप्रतिनिधींमार्फत तयार करून घेतला आहे. अर्धा महिना घालवल्यानंतर स्थायी समितीने हे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत सादर केले आहे. गेले दोन दिवस या अंदाजपत्रकावर चर्चा सुरू आहेत. या अंदाजपत्रकावर पहिला दिवस चर्चेत गेला आहे. दुसरा आज (ता. ७) दिवसही चर्चेत गेला. प्रत्येक सदस्याने कोट्यवधींची कामे आणि तरतुदी सुचवल्या आहेत; परंतु प्रत्यक्षात त्यांची पूर्तता होणार आहे की नाही, हे अर्थसंकल्पाच्या अंतिम क्षणी स्पष्ट होणार आहे; मात्र अर्थसंकल्पात जर अपेक्षित उत्पन्नापर्यंत प्रशासनाला पोहोचता येत नसेल, तर मग खर्चाचा अंदाज चुकीचे ठरत आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात सत्ताधाऱ्यांनी धरलेले उत्पन्नाचे ठोकताळे चुकीचे ठरतील, अशी शक्यता विरोधकांकडून वर्तवण्यात येत आहे.
यंदाच्या वर्षी अंदाजपत्रकात आयुक्तांनी चार हजार ७०९ कोटी ९४ लाख ६७ हजार उत्पन्न अपेक्षित धरले आहे. यात स्थायी समितीने भर घालून पाच हजार ४३८ कोटी ५९ लाख ६७ हजार इतके उत्पन्न अपेक्षित धरले आहे; परंतु गेल्यावेळी जमा झालेल्या एकूण उत्पन्नाचे आकडेवारी पाहता यावर्षीदेखील प्रशासन तेवढी रक्कम भरून काढतील का, हा प्रश्न जाणकारांकडून उपस्थित होत आहे.
कामाची यादी वाचन
नवी मुंबई महापालिकेतर्फे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये गेले दोन दिवस सर्वसाधारण सभेत चर्चा सुरू असून सर्वच नगरसेवक आपल्या प्रभागात काय विकासकामे अपेक्षित आहेत, याची घरून लिहून आणलेली यादीच वाचन करीत आहेत. प्रत्यक्षात अंदाजपत्रकातील तरतुदी पाहून यात वाढ करणे अथवा कपात करणे, यावर एक किंवा दोन महिला नगरसेविका बोलल्या असतील; मात्र प्रत्यक्षात अंदाजपत्रकावर बोलल्यास अर्थसंकल्पात भरीव तरतुदी होतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
चार वर्षांत जमा झालेले उत्पन्न (कोटींमध्ये)
२०२२ २,७२०
२०२३ ३,१००
२०२४ ३,३४८
२०२५ (अपेक्षित) ४,४०८
२०२५ (जमा) २,३७५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.