देवदर्शनाबरोबर पर्यटनाचा आनंद
जीवदानीच्या डोंगरावर काचेच्या गॅलरीची उभारणी
संदीप पंडित ः सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. ८ ः वसई-विरारच्या जीवदानी देवीच्या डोंगरावर समुद्रसपाटीपासून १,५०० फूट उंचीवर काचेची गॅलरी उभारण्यात येत आहे. या गॅलेरीमुळे देवदर्शनाबरोबर भाविकांना पर्यटनाचाही आनंद लुटता येणार आहे.
जीवदानी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक येत असतात. त्यांना पर्यटनाचा आनंद मिळावा, या दृष्टीने ही गॅलरी बनवण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या गॅलरीमधून सफाळा ते भाईंदरच्या उत्तन परिसर पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पूर्ण विरार अर्नाळा परिसरही पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या गॅलरीचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. ३० मीटर परीघ असलेल्या गॅलरीच्या काचेची रुंदी आठ बाय आठ फूट आहे. या प्रकल्पासाठी वापरलेली काच विशेष तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे.
------------------------------
प्रमुख वैशिष्ट्ये
काचेची जाडी ३९ मिमी इतकी आहे. एकाच वेळी साधारण ५० लोक उभे राहू शकतात, तर २०० पर्यटक एकाच वेळी गॅलरीत फिरण्याचा आनंद घेऊ शकतात. संपूर्ण गॅलरी सुमारे ३.५ टन वजनाचा भार पेलण्यास सक्षम आहे. या प्रकल्पासाठी ८४ लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
---------------------
आव्हानांशी सामना
डोंगरावरील दुर्गम भागात काचा पोहोचवणे कठीण असल्यामुळे अत्याधुनिक क्रेनचा वापर करण्यात आला. या क्रेन जीवदानी मंदिर संस्थानने तयार केल्या आहेत. त्यासाठी आठ लाखांचा खर्च झाला होता. यात एकूण तीन क्रेनचा वापर केल्याची माहिती अभियंता हेमंत चंद्रकांत महाजन यांनी दिली.
===========================================
भविष्यातील पर्यटन केंद्र
या गॅलरीत उभे राहिल्यावर पर्यटकांना विरारपासून ते उत्तनच्या खाडीपर्यंत तसेच सफाळ्यापर्यंतचा निसर्गरम्य परिसर पाहता येईल. त्यामुळे भविष्यात हे ठिकाण पालघर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन केंद्र ठरणार आहे.
===================================
अशा प्रकारची ठिकाणे पाहण्यासाठी परदेशात जावे लागते. त्यामुळे जागतिक दर्जाची गॅलरी उभारण्याचा मानस आहे. या ठिकाणाहून संध्याकाळचा सूर्यास्त बघणे पर्वणी असणार आहे.
- पंकज ठाकूर, उपाध्यक्ष, जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट, विरार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.