मुंबई

निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे कर्जत शहराची ‘बजबजपुरी’ जैसे थे

CD

कर्जतमध्ये अतिक्रमणांचा वाढता विळखा
अनधिकृत बांधकामे, हातगाड्या व पार्किंगचा गंभीर प्रश्न
कर्जत, ता. ८ (बातमीदार) ः कर्जत शहरात अनधिकृत बांधकामे, रस्त्यांवरील हातगाड्यांचे अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगमुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. नगर परिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शहराचा श्वास कोंडला असून, नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये रस्त्यालगत आणि थेट रस्त्यावरच हातगाड्या आणि छोटे व्यावसायिक अतिक्रमण करत असल्याने नागरिकांना चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते रेल्वे स्थानक हा परिसर पूर्णपणे गजबजलेला असून, येथे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. कर्जत शहरातील पोलिस मैदान ते आमराईपर्यंतचा भाग तसेच इतर बाजारपेठांमध्येही हातगाड्यांचे अतिक्रमण वाढत आहे, तर मुद्रे, दहिवली, गुंडगे, भिसेगाव आदी भागातही अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. याविरोधात काही वर्षांपासून विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी आंदोलन करून नगर परिषदेला निवेदने दिली. मात्र, कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. कर्जत शहर बचाव समितीसह अनेकांनी आवाज उठवूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही.

पार्किंगच्या नियमांकडे दुर्लक्ष
१ शहरात उभ्या राहणाऱ्या नवीन उंच इमारतींना परवानगी देताना पार्किंगच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही समोर आले आहे. परिणामी, इमारतींमधील रहिवासी आपली चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी करतात. अनेक ठिकाणी चारचाकी गाड्या आठवडे-आठवडे हलविल्या जात नाहीत, त्यामुळे नागरिकांना आणि आपत्कालीन सेवांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
२ बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेले पोलिस मैदान लवकरच बंदिस्त होणार असल्याने शहरातील उपलब्ध पार्किंगची शेवटची सोयही कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांसाठी वाहन उभे करण्याची मोठी अडचण निर्माण होणार आहे.

शहराची ‘बजबजपुरी’
प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे शहराची ‘बजबजपुरी’ झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन अतिक्रमण हटवणे, पार्किंगची सुविधा निर्माण करणे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इराणला शस्त्र देणाऱ्या देशांना ५०% टॅरिफ लागणार; युरेनियम संवर्धन करणार नाही, सीजफायरनंतर ट्रम्प यांचा मोठा निर्णय!

अवैध मासेमारी करणाऱ्यांनो सावधान! महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आता ड्रोनची नजर राहणार; सरकारचा नवा प्लॅन लागू

Sahyadri Express Railway Route : सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे मार्गात मोठा बदल, कोल्हापूर-पुणे खडकीपर्यंतच धावणार रेल्वे; मुंबईच्या प्रवाशांचे होणार हाल

IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा पराभव झाला, तरी ड्रेसिंग रुममध्ये तिघांना पुरस्कार मिळाला; हार्दिक पांड्याचा चेहरा पाहण्यासारखा होता Video

TV Safety Tips : एक चूक अन् घरातला टीव्ही होईल ब्लास्ट; त्यामुळं उन्हाळ्यात अजिबात करू नका 'या' 2 गोष्टी

SCROLL FOR NEXT