

Sahyadri Express Railway Route kolhapur mumbai train
esakal
Kolhapur Pune train news : कोल्हापूर-पुणे स्पेशल (सह्याद्री एक्सप्रेस) ही गाडी आता खडकीपर्यंत विस्तारित करून नियमित करण्यात आली असून, गाडी क्र. ११४१९/२० कोल्हापूर-खडकी एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. कोरोना महामारीनंतर झिरो टाईम टेबल अंतर्गत बंद झालेली ही गाडी आता कायमस्वरूपी खडकीपर्यंतच धावणार असून तिचा मुंबई पर्यंतचा प्रवास आत्ता दिवा स्वप्न बनला की काय असा संतप्त सवाल ही प्रवाशांकडून विचारला जात आहे. प्रामुख्याने ही गाडी पनवेलमार्गे सोडण्याची रेल्वे प्रवासी आणि रेल्वे संघटनांनी केली आहे. मात्र या मागणीकडे रेल्वे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.