मुंबई

धारावीत कचरा उचलण्यास वेग

CD

धारावीत कचरा उचलण्यास वेग
‘सकाळ’च्या वृत्तानंतर पालिकेची तातडीची कारवाई
धारावी, ता. ८ (बातमीदार) : वारंवार स्वच्छता मोहिमा राबवूनही धारावीतील अनेक वस्त्यांमध्ये कचऱ्याची समस्या कायम होती. विविध ठिकाणी कचराकुंड्या ओसंडून वाहत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. कचराकुंड्यांच्या आसपास साचलेल्या कचऱ्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते. अनेकांना नाक दाबून चालावे लागत असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या समस्येवर ‘सकाळ’च्‍या सोमवारच्‍या (ता. ६) अंकात वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत मुंबई महापालिकेने तातडीने हालचाल करत युद्धपातळीवर कचरा उचलण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता होत असून, स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
धारावीतील अस्वच्छतेचा फटका आरोग्य व्यवस्थेलाही बसत असल्याचे समोर आले आहे. लोकनेते एकनाथ गायकवाड (छोटा सायन) रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी कचरा व्यवस्थापनाबाबत चिंता व्यक्त केली होती. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासोबतच कचऱ्याची योग्य विल्हेवाट कशी लावावी, याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक जण स्वच्छतेचे मूलभूत नियम पाळत नाहीत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
स्थानिक रहिवासी पारी राजन यांच्या मते, अस्वच्छतेमुळे आरोग्यावर परिणाम होतो, याची जाणीव सर्वांना आहे. मात्र जागेची कमतरता आणि अपुऱ्या सुविधांमुळे अनेकदा कचरा कुठेही टाकला जातो.
समाजसेवक खुर्शीद शेख यांनीही यावर भाष्य करताना सांगितले की, महापालिका आणि स्थानिकांकडून प्रयत्न सुरू असले, तरी अपुऱ्या कचराकुंड्या आणि कचरा टाकण्यासाठी जागेची कमतरता ही मुख्य समस्या आहे. योग्य नियोजन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटू शकते.
संत रोहिदास मार्ग, ६० फूट रस्ता, कुंभारवाडा, लेबर कॅम्प, पीएमजीपी कॉलनी, संत कक्कया मार्ग, ट्रांझिट कॅम्प आदी भागांत कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. मात्र, सध्या महापालिकेकडून स्वच्छतेसाठी जोरदार मोहीम राबवण्यात येत असून, धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीत स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इराणला शस्त्र देणाऱ्या देशांना ५०% टॅरिफ लागणार; युरेनियम संवर्धन करणार नाही, सीजफायरनंतर ट्रम्प यांचा मोठा निर्णय!

अवैध मासेमारी करणाऱ्यांनो सावधान! महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आता ड्रोनची नजर राहणार; सरकारचा नवा प्लॅन लागू

Sahyadri Express Railway Route : सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे मार्गात मोठा बदल, कोल्हापूर-पुणे खडकीपर्यंतच धावणार रेल्वे; मुंबईच्या प्रवाशांचे होणार हाल

IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा पराभव झाला, तरी ड्रेसिंग रुममध्ये तिघांना पुरस्कार मिळाला; हार्दिक पांड्याचा चेहरा पाहण्यासारखा होता Video

TV Safety Tips : एक चूक अन् घरातला टीव्ही होईल ब्लास्ट; त्यामुळं उन्हाळ्यात अजिबात करू नका 'या' 2 गोष्टी

SCROLL FOR NEXT