मुंबई

उल्हासनगरात मौजमजेसाठी दुचाकींची चोरी

CD

उल्हासनगरात मौजमजेसाठी दुचाकींची चोरी
अल्पवयीन टोळी गजाआड; सहा महागड्या गाड्या हस्तगत
उल्हासनगर, ता. ८ (बातमीदार) : शहरात सातत्याने होणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात विठ्ठलवाडी पोलिसांना मोठे यश आले आहे. केवळ मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांचा पर्दाफाश करत पोलिसांनी त्यांच्याकडून सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे उल्हासनगर आणि कल्याण परिसरातील वाहनचोरांचे धाबे दणाणले आहेत.

विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या तक्रारी वाढल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे नेवाळी परिसरातून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळवले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी व पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक बंकटस्वामी दराडे, कर्मचारी रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, सचिन पाटील आणि चंदू गायकवाड यांचा समावेश होता.

पाठलाग करून पकडले
विठ्ठलवाडी पोलिस पथक गस्त घालत असताना दोन संशयित मुले पोलिसांना पाहून पळू लागली. पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या मुलांनी विठ्ठलवाडी आणि कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गाड्या चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी विठ्ठलवाडीतून दोन आणि कोळसेवाडीतून चार अशा एकूण सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या गाड्यांची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. प्राथमिक तपासात ही मुले केवळ शहरात फिरण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरत असल्याचे समोर आले आहे.

पुढील तपास आणि आव्हान
या प्रकरणातील इतर काही साथीदार किंवा या चोरीच्या गाड्यांची विल्हेवाट लावणारे कुणी खरेदीदार आहेत का, याचा तपास आता पोलिस करत आहेत. अल्पवयीन मुलांनी गुन्हेगारीकडे वळणे ही चिंतेची बाब असून, पालकांनी आपल्या मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ceasefire: इस्रायलकडून बेरूतवर मोठा हवाई हल्ला; ८० जणांचा मृत्यू, १०० लोक जखमी, इराणकडून होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर बंदी

Shaktipeeth Highway On Raju Shetti : शक्तिपीठ महामार्गाच्या नवीन नकाशाला राजू शेट्टींचा विरोध, सांगली, कोल्हापुरातून पुन्हा आंदोलन पेटणार

MPSC Success Suraiya Desai : संसार सांभाळत स्पर्धा परीक्षेत यश; कोल्हापुरची सुरैया देसाईं महिलांमध्ये राज्यात प्रथम

Pune water supply news: पुण्यात १५ टक्के पाणी कपात टाळण्यासाठी गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न; समान पाणी पुरवठा योजना व स्मार्ट मीटरवर भर

Mehkar Lonigavli POCSO Case: लोणी गवळी शाळेत तिसरीतील मुलींचा विनयभंग करणारा मास्तर ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या स्वाधीन; जिल्ह्यात संतापाची लाट

SCROLL FOR NEXT