मुंबई

खारघरमध्ये महान व्यक्तींचे थ्रीडी मॉडेल प्रदर्शन

CD

खारघर, ता. ८ (बातमीदार) : घरकुल येथील तक्षशिला बौद्ध सेवा मंडळाच्या वतीने खारघरमध्ये ११ ते १९ एप्रिलदरम्यान ‘सन्मान ते मुक्ती ः एका क्रांतीची वाटचाल’ या विषयावर आधारित थोर महान व्यक्तीच्या जीवनावर आधारित थ्रीडी मॉडेल प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाला राजकीय आणि शासकीय व्यक्ती या प्रदर्शनाला भेट देणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

समाजसेवेचे व्रत हाती घेत तक्षशिला बौद्ध सेवा मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जाते. दरम्यान, यंदा ११ ते १९ एप्रिलदरम्यान महान व्यक्तींच्या जीवनावर आधारित थ्रीडी मॉडेल प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. समाज परिवर्तनाच्या प्रेरणादायी प्रवासाचे जिवंत चित्रण या प्रदर्शनात दाखवले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे दर्शन किल्ल्याच्या मॉडेलद्वारे घडविण्यात येणार आहे. यातून रयतेची स्थिती आणि स्वराज्याची जाणीव, तसेच संत तुकाराम महाराज यांच्या समतेच्या आणि भक्तीच्या विचारांना पंढरपूर मंदिराच्या मॉडेलमधून उभे केले जाणार आहे. याशिवाय महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाच्या क्रांतीचे दर्शन, कोल्हापूर पॅलेसचे मॉडेलच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज यांच्या न्याय आणि समानतेच्या वारशाचे प्रतीक, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून उभ्या राहिलेल्या संघर्षाची जाणीव गावातील घराचे वास्तव्य, गाडगेबाबा यांच्या स्वच्छता आणि मानवतेच्या आदर्शाला चोखामेळा धर्मशाळेच्या समाजकार्य आणि समाजपरिवर्तनाची सशक्त परंपरा पुढे नेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास, संघर्ष, शिक्षण, चळवळ आणि घटनात्मक कार्य व्यापक या थ्रीडी मॉडेलद्वारे प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे, असे मंडळाचे पदाधिकारी अभिजित देहाडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT