मुंबई

अवकाळीने फळांचा दर्जा घसरला

CD

तुर्भे, ता. ८ (बातमीदार) : मागील आठवड्याच्या अखेरीस राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे द्राक्षे, कलिंगड, टरबूज, पपई यांसारख्या फळांच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, मुंबईच्या घाऊक बाजारातील या फळांची आवक घटली आहे. बाजारात आता पावसात भिजलेला माल येत असून त्याचा दर्जा सुमार असल्याने त्यांच्या दरावरही परिणाम झालेला पाहायला मिळत आहे.

गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी अवकाळीने हजेरी लावली. यात नाशिक परिसरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे द्राक्षांच्या बागांना त्यांचा थेट फटका सहन करावा लागला. आधीच यावर्षी द्राक्षाचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे आणि त्यातच उत्पादन आधीच कमी होते. त्यामुळे द्राक्षांचे दर यावर्षी दुप्पट आहेत. आता द्राक्षांची आवक बाजारात वाढायला सुरुवात होत असताना आलेल्या पावसामुळे द्राक्षांवर दुहेरी संकट आले आहे. यामुळे द्राक्षांच्या बागांवर पाणी पडले आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणात द्राक्षे पाण्यामुळे खराब झाली आहेत. काही शेतकऱ्यांनी माल बाजारात पाठवायला सुरुवात केली आहे; मात्र पाण्यामुळे या द्राक्षांची चव गेली आहे. तरीदेखील घाऊक बाजारात द्राक्षांच्या आठ ते दहा किलोची पेटी ८०० ते १,२०० रुपयांना मिळत आहे.

चवीवर परिणाम
मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी दर दुप्पट आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात द्राक्षे २०० रुपये किलो आहेत; मात्र त्यांनाही हवी तशी गोडी राहिली नाही. तासगावची द्राक्षे बाजारात येणे बंदच झाली आहेत. सध्या सोलापूरमधील आवक होत आहे. याचप्रमाणे कलिंगड, टरबूज, पपईच्या बागाही पावसाच्या पाण्याने खराब झाल्या आहेत.

फळांना पाण्याचा धोका
कलिंगड, टरबूज हे जमिनीवर येणारे पीक आहे. या पिकाचे पावसाच्या पाण्याने नुकसान झाले आहे. पाणी लागल्याने ही फळे खराब होऊ लागली आहेत, तर झाडावरची पपई गळून गेली आहे. त्यामुळे मिळेल त्या दराने ही फळे विकली जात आहेत. घाऊक बाजारात ही फळे आठ ते दहा रुपये किलो झाली आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात दर कमी झाल्याची माहिती व्यापारी शिवाजीराव चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ceasefire: इस्रायलकडून बेरूतवर मोठा हवाई हल्ला; ८० जणांचा मृत्यू, १०० लोक जखमी, इराणकडून होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर बंदी

Shaktipeeth Highway On Raju Shetti : शक्तिपीठ महामार्गाच्या नवीन नकाशाला राजू शेट्टींचा विरोध, सांगली, कोल्हापुरातून पुन्हा आंदोलन पेटणार

MPSC Success Suraiya Desai : संसार सांभाळत स्पर्धा परीक्षेत यश; कोल्हापुरची सुरैया देसाईं महिलांमध्ये राज्यात प्रथम

Pune water supply news: पुण्यात १५ टक्के पाणी कपात टाळण्यासाठी गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न; समान पाणी पुरवठा योजना व स्मार्ट मीटरवर भर

Mehkar Lonigavli POCSO Case: लोणी गवळी शाळेत तिसरीतील मुलींचा विनयभंग करणारा मास्तर ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या स्वाधीन; जिल्ह्यात संतापाची लाट

SCROLL FOR NEXT