मुंबई

ठाण्यात केरोसिनचा दिवा पेटलाच नाही

CD

केरोसीन वितरणात अडथळे
एप्रिलचा पहिला आठवडा उलटला तरी पुरवठा ठप्प; दोन लाखांहून अधिक लाभार्थी प्रतीक्षेत
ठाणे, ता. ९ : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला प्रखरतेने बसू लागला आहे. केंद्र सरकारने गॅसतुटवड्यावर पर्याय म्हणून केरोसीन वाटपाचा निर्णय घेऊन महिना उलटला तरी एप्रिलचा पहिला आठवडा संपल्यानंतरही अद्याप जिल्ह्याला केरोसीनचा पुरवठा झालेला नाही. परिणामी, प्रशासनाच्या घोषणा कागदावरच राहिल्याने ग्रामीण भागात अद्याप केरोसीनचा दिवा पेटलाच नसल्याचे विदारक चित्र आहे.

इराण, अमेरिका आणि इस्राईल यांच्यातील युद्धामुळे जागतिक स्तरावर खनिज तेल आणि गॅस वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भारतातही घरगुती गॅसचा पुरवठा विस्कळित झाल्याने केंद्र सरकारने १२ मार्च २०२६ला एलपीजीला तात्पुरता पर्याय म्हणून केरोसीन वाटपाचे आदेश दिले होते.

नियोजन कागदावर
राज्याला मंजूर ३७.४४ लाख लिटरपैकी ठाणे जिल्ह्यासाठी ४८ हजार लिटर केरोसीन साठा राखीव ठेवण्यात आला आहे. या साठ्याच्या वितरणासाठी जिल्ह्यात चार टँकरना परवानगी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात डेपोतून साठा उपलब्ध न झाल्याने वितरण रखडले आहे. जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार २५० शिधापत्रिकाधारकांना (पिवळे, केशरी व सफेद) मार्च-एप्रिलमध्ये हे केरोसीन मिळणार होते. मात्र एप्रिलचा निम्मा पंधरवडा जवळ आला तरी डेपोत केरोसीन न पोहोचल्याने पुरवठा विभाग हतबल झाला आहे.

व्यावसायिकांचीही कोंडी
गॅस तुटवड्यामुळे व्यावसायिक सिलिंडरच्या वापरावर निर्बंध लादल्याने जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय आधीच संकटात आहे. अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली असून, आता घरगुती वापरासाठीचे केरोसीनही मिळेनासे झाल्याने ग्रामीण भागातील जनतेची मोठी गैरसोय होत आहे.

प्रशासकीय दिरंगाईचा फटका
जिल्हा पुरवठा विभागाने तालुकानिहाय मागणी नोंदवली आहे, परंतु मुख्य साठ्यासाठी केंद्राकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. केरोसीन प्राप्त होताच तातडीने वितरण करण्यात येईल, अशी माहिती पुरवठा विभागातील सूत्रांनी दिली आहे. या विलंबामुळे केंद्र सरकारच्या आदेशाचा मूळ उद्देशच सफल होताना दिसत नाही.

आकडेवारी
शिधापत्रिका प्रकार संख्या
पिवळे (अंत्योदय) ४८,७९५
केशरी १,१६,१४५
सफेद ४१,३१०
एकूण लाभार्थी २,०६,२५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh Ghat Accidents: उत्तर प्रदेशमध्ये गंगा स्नानादरम्यान मोठा अपघात, १२ जण बुडाले; ५ भाविकांचा मृत्यू

Varkari Controversy: वारकरी संप्रदायाचा अवमान प्रकरण: विकास लवांडे यांना जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, वारीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

Latest Marathi News Live Update : ३ महिन्यांच्या मुलीला गटारात फेकून तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली आरोपी वडिलांना अटक

Breakfast Drink: व्यस्त लाइफस्टाइलसाठी नवी ब्रेकफास्ट स्मूदी! रेडी-टू-ड्रिंक; हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचा फॉर्म्युला

IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

SCROLL FOR NEXT