मतदार नोंदणी, जनजागृतीसाठी महापालिकांची मदत
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे नियोजन
ठाणे, ता. ९ : राज्यातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन आता अधिक आक्रमक झाले आहे. जिल्ह्यातील मतदार नोंदणीची (मॅपिंग) प्रक्रिया अधिक सुलभ आणि व्यापक करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महापालिकांना सक्रिय करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. यासाठी महापालिकांच्या मालकीच्या जाहिरात फलकांचा आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
ठाणे महापालिकेत आयोजित विशेष बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा घेतला. २००२ मधील शेवटच्या सखोल पुनरीक्षणानंतर आता पुन्हा एकदा व्यापक स्तरावर ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ज्या मतदारांची नावे २००२ च्या मतदार यादीत आहेत, त्यांनी थेट स्वतःच्या नावाचे मॅपिंग करावे. तसेच ज्या नवीन मतदारांची नावे २००२ मध्ये नव्हती, त्यांनी आपल्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या २००२ मधील नावाचा संदर्भ घेऊन आपले नाव लिंक करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. यामुळे मतदार यादीतील नोंदी अधिक अचूक होण्यास मदत होणार आहे.
डिजिटल मोहिमा
महापालिकांच्या मालकीच्या फ्लेक्स, बॅनर आणि जाहिरात फलकांवर निवडणूक आयोगाचे एकसंध संदेश प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकाच मतदाराचे दोन ठिकाणी नाव असल्यास, विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने त्या नोंदी शोधून ‘फॉर्म ७’ द्वारे त्या वगळण्याची प्रक्रिया अधिक गतीने राबवण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मतदार यादी शुद्धीकरणाचे काम करत आहोत. महापालिका आयुक्तांशी चर्चा करून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनजागृती वाढवण्यावर आम्ही भर दिला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या या मोहिमेत सहभागी होऊन आपले नाव योग्यरीत्या लिंक करावे.
- डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.