मुंबई

मुरुड फणसाड अभयारण्य मुबलक पाणवठे !

CD

फणसाड अभयारण्यात वन्यजीवांसाठी पाणी
मुरूड, ता. ९ (बातमीदार) ः राज्यात उन्हाचा कडाका वाढत असून, मुरूड तालुक्यातही पारा ३४ ते ३५ अंशांपर्यंत पोहोचला आहे. असे असतानाही, जैवविविधतेने नटलेल्या फणसाड अभयारण्यातील वन्यजीवांसाठी पाण्याची चोख व्यवस्था वन विभागाने केली आहे. अभयारण्यातील ५४ चौ.कि.मी. क्षेत्रात नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठ्यांद्वारे मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
फणसाड अभयारण्य हे नबाबकालीन संरक्षित शिकार क्षेत्र असून, येथे घनदाट जंगल आहे. मुंबईपासून १५४ कि.मी. अंतरावर असलेले हे अभयारण्य पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या वैविध्य पूर्ण अभयारण्यात ७१८ प्रकारची वनसंपदा असून, १५४ पक्षी प्रजाती आणि ५० हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती, २४ प्रकारचे सस्तन प्राणी आणि २० प्रकारचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळून येतात. येथे रानगवे आणि रानकुत्रे यांचे दर्शन अलीकडे वाढले असल्याने निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे
यंदा पर्जन्यमान समाधानकारक झाल्याने अभयारण्यातील नैसर्गिक स्रोत अद्याप जिवंत आहेत. फणसाड व विहूरची दोन धरणे आणि २७ नैसर्गिक पाणवठ्यांपैकी तब्बल २२ मध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. याशिवाय वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून, वाहनाने पाणवठ्यामध्ये पाणीपुरवठा करत असल्याची माहिती फणसाड अभयारण्य वन परिक्षेत्र अधिकारी नितीन ढगे यांनी दिली.

पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था
पर्यटकांसाठी अभयारण्यात भटकंतीसाठी विशेष वाटा तयार केल्या असून, त्यामध्ये फणसाड गाण, सावर तलाव, सुपेगाव देवराईचा समावेश आहे. गाण अर्थात पाण्याचा साठा, अभयारण्यात २७ गाण असून, यातील चिखल गाण यावर २४ तासांत एकदा वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येत असल्याचे निरीक्षकांनी सांगितले आहे. पुण्याचा माळ, चाकाचा माळ, दांडा या ठिकाणी उंच मनोरे उभारण्यात आले आहेत. बैलगाडी सफरीसाठी स्थानिकांनी व्यवस्था केली आहे.

मुरूड फणसाड अभयारण्य परिसर घनदाट जंगलाचा असल्याने प्राण्यांचे उन्हापासून सरंक्षण होते. पिण्याचे पाणी धरण व विहूर धरणात मुबलक असून, नैसर्गिक पाणवठे सतत वाहत आहेत. तरीही शासनाकडून प्रत्येक चौकीत पाण्याचे टॅॅंक पुरविण्यात आले आहेत. आमचे कर्मचारी वृंद पाण्याचे घट भरण्याचे काम नियमितपणे करीत आहेत.
- नितीन ढगे, वन परिक्षेत्र अधिकारी, फणसाड अभयारण्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT