मुंबई

कचरा वेचकांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळा यशस्वी

CD

क्षमता बांधणी कार्यशाळा यशस्वी
कचरा वेचकांच्या स्वच्छता व्यवस्थापनातील भूमिकेबाबत मार्गदर्शन

कासा, ता. ९ (बातमीदार) : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत डहाणू नगर परिषदेमार्फत कचरा वेचकांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शहरातील सर्व कचरा वेचकांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

स्वच्छता व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या कचरा वेचकांचे कौशल्य विकसित करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेदरम्यान कचरा वर्गीकरण, सुरक्षितता उपाययोजना, वैयक्तिक आरोग्याची काळजी तसेच स्वच्छता व्यवस्थापनातील कचरा वेचकांची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच, दैनंदिन काम करताना घ्यावयाच्या आवश्यक काळजी, संरक्षणात्मक साधनांचा वापर आणि स्वच्छतेच्या सवयींबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. यामुळे कचरा वेचकांना त्यांच्या कामात अधिक सुरक्षितता व कार्यक्षमता साध्य करण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.

कार्यशाळा पार पडल्यानंतर सर्व सहभागी कचरा वेचकांना प्रमाणपत्रे तसेच भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे कचरा वेचकांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन स्वच्छ महाराष्ट्र अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या वेळी डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अक्षय गुडध्ये, व इतर अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

Latest Marathi News Live Update : भांडुपमध्ये खाजगी रुग्णालयामध्ये एका कर्मचाऱ्याचा 19 वर्षाच्या मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT