नियम पाळणाऱ्या दगड खाणींना उत्खननाची परवानगी
महसूलमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
श्रीवर्धन, ता. ९ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील दगड खाण मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आवश्यक सर्व कागदपत्रांची आणि नियमांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. मात्र, यादरम्यान कोणत्याही प्रकारचे अवैध उत्खनन होणार नाही, याची काटेकोर खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्या.
रायगड जिल्ह्यातील गौण खनिज उत्खनन अंतर्गत श्रीवर्धन मतदारसंघातील दगडखाणींसंदर्भात महसूलमंत्री दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रायगडचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. खाण मालकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, ज्यांनी पर्यावरणीय परवानगीसाठी अर्ज केला आहे, त्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. अशा खाण मालकांकडून पुढील तीन महिन्यांच्या आत ही परवानगी मिळवू असे प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन त्यांना तात्पुरती उत्खनन परवानगी देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. तसेच शासन स्तरावर पर्यावरणीय परवानग्यांची प्रक्रिया अधिक वेगवान करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
उत्खननाला परवानगी देतानाच महसूलमंत्र्यांनी प्रशासनाला अवैध प्रकारांबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला. जेवढा परवाना दिला आहे, तेवढ्याच मर्यादेत उत्खनन होत आहे का, याची काटेकोर पडताळणी करावी. कोणत्याही परिस्थितीत अवैध उत्खनन होणार नाही, याची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे मंत्री बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.