सर्वोदयनगर बस थांबा अडथळामुक्त
प्रवाशांना दिलासा; सकाळच्या बातमीचा परिणाम
जोगेश्वरी, ता. ९ (बातमीदार) : जोगेश्वरी पूर्व येथील सर्वोदयनगर मार्गावरील बस थांब्याबाबत ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा बस थांबा विविध अडथळ्यांमुळे वापरात नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. आता हा बस थांबा पुन्हा प्रवाशांसाठी उपलब्ध झाला असून, स्थानिकांनी यासाठी सकाळचे आभार व्यक्त केले आहेत.
हेमा इंडस्ट्री परिसर तसेच सृष्टी इमारतीसमोरील हा बस थांबा रस्त्यावरील सुरू असलेल्या कामामुळे पूर्णपणे वेढला गेला होता. बस थांब्याभोवती हिरव्या कापडाचे आच्छादन करण्यात आले होते. याशिवाय पदपथावर कुंड्या, नारळाच्या झाडांच्या झावळ्या तसेच फेरीवाल्यांच्या गाड्यांमुळे संपूर्ण परिसर अडथळ्यांनी व्यापला होता. परिणामी हा बस थांबा वापरणे अशक्य झाले होते आणि बससेवाही तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. यासंदर्भात ‘सर्वोदयनगर बस थांब्यावर गैरसोय’ या शीर्षकाखाली २२ मार्च रोजी ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची दखल घेत स्थानिक नगरसेविका शिवानी परब यांनी पालिकेला तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार ‘के पूर्व’ विभागाचे आयुक्त नितीन शुक्ला यांच्या आदेशानुसार निष्कासन विभागाचे अधिकारी मॅन्युअल फर्नांडिस यांच्या पथकाने कारवाई करत बस थांब्याभोवती लावलेले हिरवे कापड, पदपथावरील कुंड्या, झावळ्या तसेच अनधिकृतपणे ठेवलेले साहित्य हटवून परिसर स्वच्छ केला. या कारवाईमुळे बसथांबा पुन्हा प्रवाशांसाठी उपलब्ध झाला असून, स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.