मुंबई

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘भरोसा सेल’चा विशेष उपक्रम

CD

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘भरोसा सेल’चा विशेष उपक्रम
रायगड पोलिसांचा अभिनव सामाजिक उपक्रम
कर्जत, ता. ९ (बातमीदार) : आदिवासी समाज अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याची जाणीव ठेवून त्यांना पुढे आणण्यासाठी ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले. कर्जत तालुक्यातील माणगाववाडी येथील आदिवासी आश्रमशाळेत आयोजित ‘प्रेरणा कार्यक्रमात’ त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर मार्गदर्शन, बालविवाह प्रतिबंध व अंधश्रद्धा निर्मूलन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात माणगाववाडी, चाफेवाडी आणि पाथरज येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या वेळी पोलिस उपअधीक्षक राहुल गायकवाड, भरोसा सेल समन्वयक स्मिता पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दलाल यांनी बालविवाह, व्यसनाधीनता आणि शिक्षणातील मागासलेपण या समस्यांवर प्रकाश टाकत बदलासाठी योग्य मार्गदर्शन गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात यशस्वी आदिवासी तरुणांनी अनुभव कथन केले. तसेच, आश्रमशाळांमध्ये साप्ताहिक मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्याची घोषणा करण्यात आली. विद्यार्थ्यांना टूथपेस्ट व ब्रशचेही वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

Latest Marathi News Live Update : भांडुपमध्ये खाजगी रुग्णालयामध्ये एका कर्मचाऱ्याचा 19 वर्षाच्या मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT