मुंबई

मदतीच्या बहाण्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

CD

पनवेल, ता. ९ (वार्ताहर) : मदतीचा बहाणा करून दोघा लुटारूंनी एका तरुणाला निर्जनस्थळी नेऊन, त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करून त्याला लुटल्याची घटना पनवेलमधील टेंभुर्डे गावाजवळ घडली आहे. या हल्ल्यात व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खांदेश्वर पोलिसांनी जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे.

गौतम मल्हारी हाके (वय ३२) हा पुण्यात राहण्यास आहे. तो बुधवारी (ता. ८) सकाळी रेल्वे पटरीच्या बाजूने, टेंभुर्डे गाव परिसरातून जात होता. या वेळी तिथे उभ्या असलेल्या दोन व्यक्तींनी त्याला अडवले. त्यातील एका व्यक्तीने माझ्या भावाला चक्कर आली आहे, त्याला मदतीची गरज आहे, असे सांगून गौतमला झाडाझुडपांच्या आडोशाला नेले. मदतीसाठी तो पुढे गेला असता, त्यातील एका लुटारूने त्याला पाठीमागून पकडले. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने त्याच्या खिशातील २,४०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यामुळे हाके याने प्रतिकार केला असता, दोघांनी चाकूने हाके याच्या उजव्या हातावर आणि छातीच्या डाव्या बाजूला वार करून गंभीर जखमी केले व तेथून पळ काढला. या घटनेनंतर जखमी हाके याला तातडीने एम.जी.एम. हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

KKR vs LSG Live: अजिंक्य रहाणेच्या मेहनतीवर सहकाऱ्यांनी फिरवले पाणी; लखनौला दिली पुनरागमनाची संधी, कोलकातात मोठा ड्रामा

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

SCROLL FOR NEXT