मुंबई

विभागीय आयुक्तांसह पोलिस प्रशासनाला न्यायालयाची चपराक

CD

नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : सानपाडा येथील एका रेस्टॉरंट आणि बारला ऑर्केस्ट्रा परवाना नाकारणे नवी मुंबई पोलिस प्रशासनाला चांगलेच महागात पडले आहे. केवळ लोकांचा विरोध आहे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या काल्पनिक भीतीपोटी परवाना नाकारता येणार नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने नवी मुंबई पोलिस आयुक्त आणि कोकण विभागीय आयुक्तांचा यापूर्वीचा आदेश रद्दबातल ठरवत याचिकाकर्त्याला चार आठवड्यांत परवाना देण्याचे आदेश दिले आहेत.

सानपाडा येथील एका इमारतीतील हाउस रेस्टॉरंट ॲण्ड बारच्या मालकांनी लाइव्ह ऑर्केस्ट्रा परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र, या प्रस्तावावर स्थानिक २३ गृहनिर्माण संस्था, २३२ नागरिक आणि काही व्यापारी संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. या हरकतींच्या आधारे, ऑर्केस्ट्रा बार सुरू झाल्यास परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कारण देत पोलिस आयुक्तांनी परवाना नाकारला होता. त्याविरोधात अपील कोकण विभागीय आयुक्तांनीही फेटाळले होते. या निर्णयाविरोधात बार मालकाने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते.

उच्च न्यायालयाने पोलिस प्रशासन आणि अपील प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला आहे. तसेच याचिकाकर्त्याला त्याचे म्हणणे मांडण्याची किंवा हरकतींना उत्तर देण्याची कोणतीही संधी न देता थेट आदेश काढणे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाविरुद्ध आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्याच इमारतीत आणि आसपासच्या परिसरात इतर बारना संगीताची परवानगी असताना केवळ एकाच बारला परवाना नाकारणे हे भेदभाव करणारे आहे. नवी मुंबईत यापूर्वी ४३ बारना असे परवाने दिले गेले आहेत, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. केवळ लोकांचा विरोध आहे किंवा तिथे डान्स बार सुरू होईल, या समजुतीवर आधारित परवाना नाकारणे चुकीचे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: 'मुंबई-गोवा'वर कोंडी; मे महिना संपत आला पण कामं अपूर्णच

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Interfaith Blood Donation: बकरी ईद निमित्त मशिदीत सर्वधर्मीयांचे रक्तदान; ‘मानवता हाच खरा धर्म’चा संदेश

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT