मुंबई

मुलुंडमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर सेमिनारचे आयोजन

CD

विद्यार्थ्यांसाठी करिअर सेमिनारचे आयोजन

मुलुंड, ता. ९ (बातमीदार) : मुलुंडमध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी मोफत करिअर मार्गदर्शन सेमिनाराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे माजी खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत ‘विवेक प्रेरणा अभ्यासिका’तर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हा सेमिनार शनिवारी (ता. ११) सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मुलुंड पश्चिम येथील गोपुरम हॉल, डॉ. राजेंद्र प्रसाद मार्ग, ज्ञान सरिता परिसर जवळ होणार आहे. या कार्यक्रमात एसएससी, एचएससी तसेच पदवीनंतरच्या शिक्षणाच्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर सरकारी व खासगी क्षेत्रातील करिअर पर्याय, तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी यावरही मार्गदर्शन केले जाईल.

या सेमिनारमध्ये शिक्षणतज्ज्ञ व करिअर कौन्सिलर सीए कन्हैया मनियार, सायन्स व इंजिनिअरिंग क्षेत्रातील शिक्षक चेतन संघवी आणि करिअरतज्ज्ञ व्रज पटेल हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांबरोबरच सीए, सीएस, एलएलबी, एमबीए यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे, डिफेन्स, नीट, आयआयटी-जेईई, कॅट, क्लॅट, आयईएलटीएस, जीआरई आदी परीक्षांची माहितीही दिली जाईल.

विवेक प्रेरणा अभ्यासिकेत सध्या अनेक विद्यार्थी सिव्हिल सर्व्हिसेस आणि इतर प्रतिष्ठित परीक्षांची तयारी करत असून, त्यांना मोफत वाचनालय व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध असून, यात सहभागी होण्यासाठी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT