मुंबई

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेतून युवकांसाठी संधी

CD

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेतून युवकांसाठी संधी
अलिबाग, ता. ९ (वार्ताहर) ः केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील तरुणांना देशातील कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा नऊ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार असून, इच्छुक पात्र उमेदवारांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये रविवार (ता. १२)पर्यंत कस्टमर केअर अँड सर्व्हिस व एचडीएफसी बँकेमध्ये मंगळवार (ता. १४)पर्यंत सेल्स अँड मार्केटिंग या क्षेत्रासाठी अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध आहे. या योजनेमुळे युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी, व्यावसायिक नेटवर्क तयार होणे, आत्मविश्वास व व्यक्तिमत्त्व विकास यामध्ये वाढ होणे इत्यादी बाबींचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेसाठी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करून कंपनीतील रिक्त पदांसाठी अर्ज करता येईल. अधिकच्या माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला भेट द्यावी, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अ. मु. पवार यांनी केले आहे.


चौकट :
अर्ज कसा करावा :
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा (PMIS) लाभ घेण्याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. उमेदवाराची नोंदणी पूर्ण झाल्यावर नामांकित कंपनीतील रिक्तपदांसाठी अर्ज करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकन सैन्याकडून हॉर्मुझजवळील 'बंदर अब्बास'मध्ये हवाई हल्ले

Yashvi Patel: पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर, तरीही मारली बाजी! पाहा कसं पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या खेळाडूला धूळ चारली!

Gluten Free Breakfast : ग्लूटेन-फ्री आणि टेस्टी! असा बनवा चविष्ट, पोटभर आणि फिटनेस फ्रेंडली ज्वारीचा उपमा!

भारत-नायजेरिया : नेहरूंपासून मोदींपर्यंत, दोन बलाढ्य देशांचे मैत्रीचे संबंध

Ambenali Ghat Accident: ‘ही दोस्‍ती तुटायची नाही’ म्‍हणतच जगाचा निरोप; आंबेनळी घाटात जीव गमावलेले पाचही जिवलग मित्र, आसगाव झाले सुन्न ..

SCROLL FOR NEXT