नाल्यातून मगरीची सुटका
मुलुंड, ता. ९ (बातमीदार)ः शहरातील सांडपाण्याच्या नाल्यात दीड फूट लांबीची मगर आढळली होती. वन्यजीव कल्याण संघटना, महाराष्ट्र वन विभागाचे पथकाने तिची सुखरूप सुटका केली.
मुलुंड पश्चिमेला निर्मल लाइफस्टाइलजवळील नाल्यात गुरुवारी (ता. ९) सकाळी मगर आढळली. याबाबतची माहिती स्थानिकांनी संबंधित यंत्रणांना दिली. या वेळी पथकाने अरुंद नाल्यात उतरून बचावकार्य सुरू केले. मगरीला सुरक्षितपणे पकडून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सुरक्षित अधिवासात हलवण्यात आले.