मुंबई

ओटला मार्केटवर एमआयडीसीचा हातोडा;

CD

ओटला मार्केटवर हातोडा
एमआयडीसीच्या कारवाईला विरोध, तीघेजण जखमी
बोईसर, ता.९ (वार्ताहर): तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ओटला मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी एमआयडीसीकडून अचानक तोडक कारवाई करण्यात आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. या कारवाईदरम्यान दोन मुले, एमआयडीसीचा एक कर्मचारी जखमी झाल्याने संताप उसळला.
कारवाई सुरू होताच दुकानदारांनी शेडवरील पत्रे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेसीबीने तोडक काम सुरूच ठेवले. विकलांगांसाठी बनवण्याकरिता दिलेल्या टपरीवरही कारवाई झाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण झाले. दरम्यान, शेडवर चढलेल्या दोघा मुलांना जेसीबीचा पंजा लागल्याने जखमी झाली. यामुळे नागरिकांनी अधिकाऱ्यांशी वाद घालत कारवाईला विरोध केला. तर काहींनी दगडफेक केल्याने टेम्पोसह कारचे मोठे नुकसान झाले. परिस्थिती चिघळल्याने घटनेनंतर पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तारापूर औद्योगिक क्षेत्राचे उपअभियंता अविनाश संखे यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
-------------------
कोणतीही पूर्वसूचनेशिवाय टपरी तोडण्यात आली. विनंती करूनही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. सहकार्य करण्याऐवजी कारवाई करण्यात आली. त्यामुळे मोठे नुकसान झाले.
- विलास भोणे, दिव्यांग आधार सेवा संस्था, बोईसर
---------------------
दिव्यांगांना कोणतीही जात नसते, सर्व समान आहेत. तरीही एमआयडीसीकडून टपरीवर अन्यायकारक कारवाई करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांवर १९९५ च्या ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करून निलंबित करावे.
- किशोर संखे, दिव्यांग आधार सेवा संस्था, बोईसर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT