मुंबई

नेरूळ एमआयडीसीत वाहतूककोंडी वाढली

CD

नेरूळ एमआयडीसीत वाहतूक कोंडी वाढली
अपघातांच्या घटनांतही वाढ; सर्व्हिस रोड धोकादायक
बेलापूर, ता. ९ (बातमीदार) : नेरूळ एमआयडीसी परिसरात वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला असून, अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. दररोज हजारो अवजड व हलकी वाहने या मार्गावरून प्रवास करत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत आहे.
नेरूळ एलपी ते उरण फाटा या सायन-पनवेल मार्गासोबत एमआयडीसीतील सर्व्हिस रोडवर नुकतेच चारपेक्षा अधिक अपघात झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये वाहनांच्या धडका तसेच दुचाकीस्वारांच्या अपघातांचा समावेश आहे. परिसरात सुरू असलेली बांधकामे, कंपन्या व शोरूम्स यामुळे वाहतुकीचा ताण वाढत असून, अनेक वाहनचालक शॉर्टकट म्हणून या रस्त्याचा वापर करतात.
वेगाने धावणारी अवजड वाहने आणि त्यामध्ये अडथळा निर्माण करणारी लहान वाहने यामुळे वाहतूक विस्कळित होत आहे. तसेच ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

चौकट
नियम कडक अंमलबजावणीची गरज
या परिसरात नियमित वाहतूक पोलिसांची उपस्थिती नसल्याने समस्या अधिक तीव्र होत आहे. दररोज वाहतूक नियमन केल्यास अपघात आणि कोंडी दोन्ही कमी होऊ शकतात, असे स्थानिकांनी सांगितले.

KKR vs LSG Live: अजिंक्य रहाणेच्या मेहनतीवर सहकाऱ्यांनी फिरवले पाणी; लखनौला दिली पुनरागमनाची संधी, कोलकातात मोठा ड्रामा

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

SCROLL FOR NEXT