भिवंडीत थकीत पगारावरून राडा
दोन कामगारांसह आठ जणांकडून लूम मालकाला मारहाण
भिवंडी, ता. ९ (वार्ताहर) : कामाचे पैसे देण्यास विलंब झाल्याच्या कारणावरून दोन लूम कामगारांनी आपल्या सहा साथीदारांच्या मदतीने मालक आणि मॅनेजरला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, औद्योगिक क्षेत्रात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
खोणीगाव येथील बागल कंपाउंडमध्ये मुन्ना सिंग (५२) यांच्या मालकीचा लूम कारखाना आहे. या कारखान्यात रितेश देवीप्रसाद मिश्रा (२२) आणि शुभम भारत वाघमारे (२४) हे दोघे कामगार म्हणून कार्यरत आहेत. ३१ मार्च रोजी रितेश आणि शुभम हे दोघे हिशोब पूर्ण करून कामाचे पैसे मागण्यासाठी कारखान्यात गेले होते. मॅनेजर सतेंदर सिंग यांच्याशी हिशोबावरून त्यांचा वाद झाला आणि त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. मालक मुन्ना सिंग हे दोघांची समजूत काढण्यासाठी मध्यस्थी करत असतानाच, रितेशने फोन करून आपल्या अन्य सहा मित्रांना तिथे बोलावून घेतले. या आठ जणांच्या टोळक्याने संगनमताने मालक आणि मॅनेजरला मारहाण केली.
निजामपुरा पोलिसांत गुन्हा दाखल
या घटनेनंतर मुन्ना सिंग यांनी मंगळवारी (ता. ७) पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी रितेश मिश्रा, शुभम वाघमारे आणि त्यांच्या इतर सहा साथीदारांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आता फरार असलेल्या इतर सहा आरोपींचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.