मुंबई

बुवापाड्यात भंगार गल्लीत प्लॅस्टिक कचऱ्याला आग

CD

अंबरनाथच्या बुवापाड्यात प्लॅस्टिक कचऱ्याला आग
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
अंबरनाथ, ता. ९ (वार्ताहर) : बुवापाडा परिसरात असलेल्या ‘भंगार गल्लीत’ गुरुवारी (ता. ९) दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. एका गोदामाशेजारी साठवलेल्या प्लॅस्टिक कचऱ्याने अचानक पेट घेतल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते. मात्र, अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी जीवित किंवा वित्तहानी टळली आहे.
बुवापाडा भागातील एका भंगाराच्या गोदामाशेजारी असलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक कचरा साठलेला होता. गुरुवारी दुपारच्या सुमारास या कचऱ्याला अचानक आग लागली. प्लॅस्टिकमुळे आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट पसरले. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाचे जवान पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. जवानांच्या अथक प्रयत्नांमुळे आग गोदामांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच विझवण्यात यश आले.

भंगार गल्लीतील आगीचे सत्र थांबेना
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात भंगाराची अनेक गोदामे असून, तिथे कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. या भागात वारंवार आगीच्या घटना घडत असल्यामुळे प्रशासनाने या गोदामांवर आणि कचरा साठवणुकीवर निर्बंध घालावेत, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

KKR vs LSG Live: अजिंक्य रहाणेच्या मेहनतीवर सहकाऱ्यांनी फिरवले पाणी; लखनौला दिली पुनरागमनाची संधी, कोलकातात मोठा ड्रामा

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

SCROLL FOR NEXT