कोकणसाठी रेल्वेची एसी विशेष गाडी
सीएसएमटी-मडगावदरम्यान चार फेऱ्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : उन्हाळी हंगामात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सीएसएमटी ते मडगावदरम्यान चार वातानुकूलित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०११२९ ही वातानुकूलित विशेष गाडी १० आणि १४ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.२० वाजता सुटून दुपारी ३.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्रमांक ०११३० ही विशेष गाडी मडगाव येथून १० आणि १४ एप्रिलला सायंकाळी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी इत्यादी महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. या गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.