मुंबई

अंबरनाथमध्ये दुचाकीच्या धडकेत महिला जखमी

CD

अंबरनाथमध्ये दुचाकीच्या धडकेत महिला जखमी
​अंबरनाथ ता. ९ (वार्ताहर) : कामावर पायी जात असलेल्या एका ३८ वर्षीय महिलेला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या अपघातात महिलेचा उजवा हात फ्रॅक्चर झाला असून, अंबरनाथ पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वैशाली भटू मराठे या बिगारी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी (ता. ६) सकाळी साडेअकराच्या सुमारास त्या कामावर जाण्यासाठी अंबरनाथ पश्चिम येथील कल्याण-कर्जत रोडवरील आयटीआय कॉलेजसमोरून पायी चालल्या होत्या. या वेळी पाठीमागून आलेल्या एका दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे वैशाली या रस्त्यावर फेकल्या गेल्या. यात त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी वैशाली मराठे यांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक आर. पी. अहिरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

Sangli Advocate Death : 'माझ्या मृत्यूला कोणालाही...'; मरण्यापूर्वी 27 वर्षीय वकिलाने चिठ्ठीत काय लिहिलं? सांगलीतील घटनेने खळबळ

आश्रम ३ मधील इंटीमेट सीनवर पहिल्यांदाच बोलला बॉबी देओल, म्हणाला, 'मी फार घाबरलो होतो'

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT