मुंबई

ऐतिहासिक लिंकन हाऊसच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

CD

ऐतिहासिक लिंकन हाऊसच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
विरोधातील याचिका फेटाळली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई रोडवरील ऐतिहासिक लिंकन हाऊसच्या पुनर्विकासाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिकेमागील हेतू हा प्रामाणिक नव्हता. तसेच ही याचिका वैयक्तिक खासगी हेतूने करण्यात आल्याचे निरीक्षण न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदवले. तसेच २०१८मध्ये पुनर्विकासाला दिलेली स्थगितीही न्यायालयाने उठवली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे लिंकन हाऊसच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पालिका प्रशासनाने विकसक मेसर्स कृष्णा ॲड कंपनीला दिलेल्या परवानग्या, सवलती किंवा मंजुरी या मनमानी, बेकायदा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका अल्टामाउंट रोड एरिया सिटिझन्स समितीने केली होती. तसेच पुनर्विकासासाठी मंजूर सर्व परवानग्या रद्द करण्याची मागणीही याचिकेत केली होती. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदा सवलती दिल्याचे नमूद करून अग्निसुरक्षा, मोकळ्या जागा आणि परिसरातील पायाभूत सुविधांच्या तणावाबद्दलही याचिकाकर्त्यांकडून वरिष्ठ वकील डॅरियस श्रॉफ यांनी सुनावणीदरम्यान चिंता व्यक्त केली. चुकीच्या सवलतींमुळे सुरक्षेशी तडजोड होऊन स्थानिक रहिवाशांच्या जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन झाल्याचा आरोपही त्यांनी केला. तथापि, सरकार आणि विकसकाने याचिकेला विरोध केला. सर्व परवानग्या, मंजुरी लागू विकास नियंत्रण नियमावली आणि त्यानंतरच्या विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन विनिमय (डीसीपीआर २०३४) नुसार मंजूर केल्या आहेत. इमारतीच्या आराखड्यांना प्रचलित नियमांनुसार मंजुरी मिळाली होती आणि हा प्रकल्प उपकरप्राप्त संरचनेचा पुनर्विकास असल्याने काही वाढीव सवलती मिळाल्याचे महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी न्यायालयाला सांगितले. राज्य सरकारचा हा युक्तिवाद मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने ग्राह्य धरला.
...
हेतूवर प्रश्नचिन्ह
संबंधित याचिका व्यापक सार्वजनिक जनहितार्थ दिसून येत नाही. वैयक्तिक कारणासाठी किंवा वैयक्तिक वैर आणि शत्रुत्व पूर्ण करण्यासाठी जनहित याचिकेचा आधार घेता येणार नाही. अशा प्रकारच्या याचिकांमुळे सरकारी यंत्रणेच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो आणि न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाया जातो, असेही निरीक्षण न्यायालयाने जनहित याचिका फेटाळून लावताना नोंदविले.
...
लिंकन हाऊसचा इतिहास
मुंबईतील ब्रीच कँडी येथील लिंकन हाऊस आधी वांकानेर हाऊस म्हणून प्रसिद्ध होते. ५०,००० चौरस फुटांची ही भव्य वास्तू एक महागडी निवासी मालमत्ता आहे. १९३३मध्ये वांकानेरच्या महाराजांसाठी बांधलेल्या या हेरिटेज वास्तूत १९५७पासून अमेरिकन वाणिज्य दूतावास होता. ही मालमत्ता २०१५मध्ये सायरस पूनावाला यांनी ७५० कोटींना खरेदी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार नाही, जय पवार यांची माहिती

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT