मुंबई

मध्य रेल्वेवर उद्या विशेष ब्लॉक

CD

मध्य रेल्वेवर उद्या विशेष ब्लॉक
लोकल फलाट विस्ताराचे काम वेगात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते वासिंददरम्यान शनिवारी (ता. ११) पहाटे २.१० ते ३.२५ या कालावधीत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. १५ डब्यांच्या लोकल सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक फलाट विस्ताराच्या कामासाठी हा ब्लाॅक घेण्यात येणार आहे.

ब्लॉकदरम्यान फलाट विस्तारासोबतच नवीन ओव्हरहेड वायर (ओएचई) यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम केले जाणार आहे. रेल्वे मार्गालगतची काही अतिक्रमणे हटवण्याची कारवाईही करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. ब्लॉकच्या कालावधीत काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ट्रेन क्रमांक १२१०२ शालिमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस वासिंद स्थानकात, ट्रेन क्रमांक १८०३० शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस आसनगाव येथे, ट्रेन क्रमांक १२८१० हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस आटगाव येथे, तर ट्रेन क्रमांक २०१०४ भटनी-एलटीटी एक्स्प्रेस खर्डी येथे थांबवण्यात येणार आहे. याशिवाय बलिया-दादर विशेष एक्स्प्रेस आणि नागपूर-मडगाव विशेष एक्स्प्रेस या गाड्यांनाही आवश्यकतेनुसार मार्गात थांबवले जाईल.

विलंबाने धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्यांबाबत त्या दिवशी स्थानकांवरून घोषणा करण्यात येणार आहे. काही गाड्या उशिराने धावण्याची शक्यता रेल्वेने व्यक्त केली आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाड्यांची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT