मुंबई

उन्हाळी प्रशिक्षण ‍शिबिराचे आयोजन

CD

उन्हाळी प्रशिक्षण ‍शिबिराचे आयोजन

पालघर, ता. ९ (बातमीदार) : उन्हाळी सुट्टीच्या काळातील खेळाडूंच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन २० ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये करण्याचे निश्चित झाले आहे.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये आठ ते १४ वयोगटातील खेळाडूंना प्रवेश दिला जाणार असून देशी व विदेशी प्रकारचे मैदानी खेळ, बॅडमिंटन, सॉफ्टबॉल, कबड्डी, खो-खो इत्यादी खेळांचे प्रशिक्षण ज‍िल्हा क्रीडा संकुल, पालघर येथे देण्यात येणार आहे. या शिबिराचे आयोजन ज‍िल्हाध‍िकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद अध्यक्षा डॉ. इंदुराणी जाखड यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली आयोजित केले जाणार असून या शिबिरासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक यांच्यामार्फत खेळांडूना मार्गदर्शन देण्यात येणार आहे. हे प्रश‍िक्षण शिबिर पूर्णपणे व‍िनामूल्य असून १५ ते २० एप्रिलपर्यंत इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी आपली नावनोंदणी करावयाची आहे. तसेच प्रशिक्षणासाठी येताना दोन फोटो, आधार कार्ड, रहिवासी दाखला, बोनाफाईड दाखला आणावयाचे असून क्रीडा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन ज‍िल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT