मुंबई

लव्ह जिहाद आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी आतिफ तासेच्या मुसक्या आवळल्या

CD

लव्ह जिहादप्रकरणी
आतिफ तासे गजाआड
मुंबईच्या कांदिवली परिसरातून अटक

मनोर, ता. ९ (बातमीदार) ः बहुचर्चित सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी आतिफ तासे याला पालघर पोलिसांनी बुधवारी (ता. ८) अटक केली. मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जमीन बळकावणे आणि खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील आरोपी आतिफ तासे याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता. नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या तासे याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
आतिफ तासे मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील काशीमिरा येथील गुलशन पटेल-तासे यांचा मुलगा असून, सायली सुर्वे लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी आहे. आरोपी आतिफ तासे, त्याची आई गुलशन तासे-पटेल यांच्यासह २० ते २५ जणांनी १९ ऑक्टोबर २०२३ला मनोरजवळील टेन गावातील जमीन बळकावण्यासाठी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यावर सशस्त्र हल्ला केला होता. याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आतिफ तासे याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने २३ मे २०२५ला रद्द केला होता. जामीन रद्द झाल्यानंतर गेल्या १० महिन्यांपासून आतिफ तासे फरार होता. पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. ८) सायंकाळी आरोपी आतिफ याला मुंबईतील कांदिवली परिसरातून गुन्हा दाखल करीत ताब्यात घेतले.

लव्ह जिहादप्रकरणी गुन्हा मागे
सायली सुर्वे हिने यू-टर्न घेतल्याने धर्मांतरण प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. सायलीने तिचा पती आरोपी आतिफ तासे आणि सासू गुलशन तासे-पटेल यांच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा स्वेच्छेने आणि तिच्या मुलांचे हित लक्षात घेऊन माणुसकी म्हणून मागे घेतला असल्याची माहिती समाजमाध्यमावर व्हिडिओ पोस्टमधून स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे सायलीने पती आरोपी आतिफ तासे आणि सासू गुलशन तासे-पटेलवर धर्म परिवर्तनासाठी दबाव, मारहाण आणि गर्भापात केल्याचे आरोप सायली सुर्वे यांनी केले होते. आरोपानंतर पुन्हा घर वापसी करीत आणि विधिवत पूजाअर्चा करून हिंदू धर्म स्वीकारला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT