मुंबई

डोंबिवली स्कायवॉक ‘ओपन टू स्काय’

CD

पावसाळ्याआधीच स्कायवॉकची दैना
दुर्लक्षामुळे प्रवाशांची सुरक्षा टांगणीला

डोंबिवली, ता. १० : डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेरील गर्दी कमी करण्यासाठी लाखो रुपये खर्चून उभारलेला पूर्वेकडील स्कायवॉक सध्या देखभालीअभावी मृत्यूचा सापळा बनत आहे. स्कायवॉकचे कापडी छत अनेक ठिकाणी फाटले असून, तो पूर्णपणे उघड्यावर पडला आहे. यामुळे प्रवाशांना ऊन-पावसाचा थेट सामना करावा लागत असून प्रशासनाच्या निष्काळजीबद्दल संताप व्यक्त होत आहे.

इंदिरा चौकाकडे जाणाऱ्या भागात कापडी शीट निखळून खाली झुकली आहे. अनेक ठिकाणी छत फाटल्याने ‘ओपन टू स्काय’ अशी अवस्था झाली आहे. स्कायवॉकच्या पायऱ्या तुटलेल्या असून लोखंडी रेलिंगही सैल झाले आहे. ध्वनी प्रदूषणासाठी लावलेल्या प्लॅस्टिक शीट तडा गेलेल्या अवस्थेत निरुपयोगी ठरत आहेत. पानाच्या पिचकाऱ्या, साचलेला कचरा आणि फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. त्यातच गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लाखो रुपये खर्च करून प्रकल्प उभा केला जातो; पण त्याच्या देखभालीकडे कोणाचेच लक्ष नसते. पावसाळा तोंडावर असूनही छताची दुरुस्ती न झाल्यास स्कायवॉकवरून चालणे कठीण होईल. पालिकेने दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

प्रशासनासमोर आव्हान
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात महापालिका केवळ कागदी घोडे नाचवणार की प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम हाती घेऊन प्रवाशांना दिलासा देणार, याकडे डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.

नागरिकांच्या मागण्या
१. पावसाळ्यापूर्वी फाटलेले कापडी छत तातडीने बदलण्यात यावे.
२. तुटलेल्या पायऱ्या आणि रेलिंगची दुरुस्ती करून विद्युत यंत्रणा सुरक्षित करावी.
३. फेरीवाले आणि गर्दुल्ल्यांचा बंदोबस्त करून नियमित साफसफाई व्हावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकन सैन्याकडून हॉर्मुझजवळील 'बंदर अब्बास'मध्ये हवाई हल्ले

Yashvi Patel: पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर, तरीही मारली बाजी! पाहा कसं पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या खेळाडूला धूळ चारली!

Gluten Free Breakfast : ग्लूटेन-फ्री आणि टेस्टी! असा बनवा चविष्ट, पोटभर आणि फिटनेस फ्रेंडली ज्वारीचा उपमा!

भारत-नायजेरिया : नेहरूंपासून मोदींपर्यंत, दोन बलाढ्य देशांचे मैत्रीचे संबंध

Ambenali Ghat Accident: ‘ही दोस्‍ती तुटायची नाही’ म्‍हणतच जगाचा निरोप; आंबेनळी घाटात जीव गमावलेले पाचही जिवलग मित्र, आसगाव झाले सुन्न ..

SCROLL FOR NEXT