मुंबई

दिवेआगरात प्री-वेडिंग शूटवरून ''सोशल'' वाद

CD

दिवेआगरात प्री-वेडिंग शूटवरून वाद
ट्रस्टचा नियमभंगाचा आरोप; पर्यटकांचा व्यवस्थेवर सवाल
श्रीवर्धन, ता. १० (बातमीदार) : दिवेआगर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले श्री रूपनारायण व श्री सुंदरनारायण मंदिर परिसरात प्री-वेडिंग फोटोशूटवरून वाद निर्माण झाला आहे. मंदिर ट्रस्टने संबंधित पर्यटकांवर नियमभंग व बदनामी केल्याचा आरोप करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, संबंधितांनी सामाजिक माध्यमावर पोस्ट करत व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काही पर्यटक ३१ मार्च रोजी प्री-वेडिंग शूटसाठी सकाळी लवकर मंदिर परिसरात दाखल झाले. ट्रस्टच्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजण्यापूर्वी चित्रीकरण करण्यास मनाई असून, पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच, मंदिर परिसराच्या देखभाल व सुरक्षेसाठी ठराविक शुल्क आकारले जाते. मात्र, संबंधितांनी हे नियम न पाळता सकाळी ६.४७ वाजता मंदिराच्या संरक्षक भिंतीवरून आत प्रवेश केल्याचा दावा ट्रस्टने केला आहे. याबाबत सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले. विनापरवानगी शूटिंग सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रस्टच्या प्रतिनिधींनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधितांनी चूक मान्य करण्याऐवजी उलट वाद घालत पैसे देण्याची भाषा केल्याचेही ट्रस्टने म्हटले आहे. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, या घटनेतील संभाषणाचा काही भाग व्हिडिओ स्वरूपात सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून मंदिर व गावाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच अधिकृत तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टकडून देण्यात आली. दरम्यान, या घटनेमुळे पर्यटनस्थळांवरील नियम, पारदर्शकता आणि पर्यटकांचे वर्तन या मुद्द्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक माध्यमांवर अर्धवट माहिती प्रसारित झाल्याने गैरसमज निर्माण होत असल्याचेही या निमित्ताने समोर आले आहे.

व्यवस्थापनात पारदर्शकतेचा अभाव
दरम्यान, प्री-वेडिंग शूटसाठी आलेल्या पर्यटकांसोबत असलेल्या रोहित राठोड या फोटोग्राफरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत मंदिरात कोणतीही स्पष्ट व्यवस्था नसल्याची तक्रार केली आहे. सकाळी परवानगी नाकारली जात असल्याचे सांगितले जात असताना तेथे कर्मचारी किंवा मार्गदर्शन करणारी यंत्रणा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, प्री-वेडिंग शूटसाठी अनौपचारिक पद्धतीने पैसे घेतले जात असल्याचा दावाही त्यांनी केला असून, करत व्यवस्थापनात पारदर्शकतेचा अभाव असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कठोर कारवाईचा इशारा
या पार्श्वभूमीवर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रणव आनंद हावरे यांनी स्पष्ट केले की, मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक नियम लागू करण्यात आले आहेत. पूर्वी दिवेआगर येथे घडलेल्या चोरी व गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटकांचे आम्ही नेहमी स्वागत करतो; मात्र नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. चुकीची माहिती पसरवून बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.


छायाचित्र :
श्रीवर्धन ः दिवेआगरमधील रुपनारायण मंदिर हे शूट आणि फोटोसाठी सुंदर स्थळ असल्याने येथे पर्यटक भेट द्यायचे. मात्र, आता याला बंदी घातली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirol Accident news : आठ दिवसात ३ वेळा नशीबाची साथ, पण नियतीच्या मनात वेगळचं होतं, शिरोळचा आकाश अपघातातच गेला

Video: पोलिस होण्याचं स्वप्न पण पायात शूज नव्हते.. चपलेवरच पाच किलोमीटर धावला; डीसीपींची कृती पाहून डोळे पाणावतील

Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’ मागचं सत्य काय? एकीकडे दावे, दुसरीकडे ठाम नकार; नेमकं चाललंय तरी काय? राजकीय तापमान वाढलं

KKR Play off Scenario : अजिंक्य रहाणेच्या संघाचा ४ सामन्यांत एकही विजय नाही; प्ले ऑफसाठी काय करावे लागेल? जाणून घ्या गणित

Latest Marathi News Live Update : अक्षरधामजवळील कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजजवळच्या उड्डाणपुलावर एका ट्रकला आग

SCROLL FOR NEXT