मुंबई

​उत्पादनात घट झाल्याने तांदळाचा तडका!

CD

​वाशी, ता. १० (बातमीदार) : उत्पादनात झालेली घट आणि जागतिक बाजारपेठेतील वाढती मागणी यामुळे तांदळाच्या भावाने आता उच्चांक गाठला आहे. बासमतीसह इतर पाच प्रमुख जातींच्या तांदळाच्या किमतीत गेल्या सहा महिन्यांत मोठी वाढ झाली असून, हे भाव १५ ते २७.५ टक्क्यांनी वधारले आहेत. पंजाब आणि हरियाना या राज्यांमध्ये तांदळाचे उत्पादन घटल्याचा थेट परिणाम आता बाजारपेठेवर दिसून येत आहे.

​नवी मुंबईतील घाऊक बाजारात तांदळाचे भाव ३२ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर किरकोळ बाजारात सर्वसामान्य ग्राहकांना हाच तांदूळ १२० ते २०० रुपये प्रतिकिलो भावाने खरेदी करावा लागत आहे. ५ नोव्हेंबर २०२५ ते १ एप्रिल २०२६ या अवघ्या सहा महिन्यांच्या काळात बासमती, तिबार, मोगरा, कोलम, परिमल आणि मसुरी या तांदळाच्या किमती प्रति क्विंटल दीड ते २७.५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. यात सर्वाधिक भाववाढ बासमती, तिबार आणि कोलम या जातींमध्ये झाली आहे. बासमती तांदळाला जागतिक स्तरावर, विशेषतः इराण आणि आखाती देशांमध्ये मोठी मागणी आहे.

गेल्या वर्षी भारतातून सुमारे ४० लाख टन बासमतीची निर्यात झाली. मात्र, दुसरीकडे मुख्य उत्पादक राज्यांत उत्पादन कमी झाल्याने पुरवठ्यावर ताण आला आहे. मुंबई एपीएमसी बाजारपेठेत दररोज सुमारे १५० टन बासमतीची आवक होते.

​बासमतीची मोठी झेप
नोव्हेंबर २०२५ मध्ये ८० रुपये किलो असलेला बासमती तांदूळ आता १०० रुपयांवर पोहोचला असून, किमतीमध्ये २५ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. तिबार तांदळाच्या भावात २१.५ टक्के वाढ होऊन तो ७० वरून ८५ रुपयांवर गेला आहे. मोगरा तांदूळ २० टक्क्यांनी महागून ३६ रुपये, तर कोलम तांदळाचे भाव ४० वरून ४५ रुपयांवर पोहोचले आहेत. इंद्रायणी तांदळाच्या भावातही १४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून, तो आता ६५ रुपये किलो झाला आहे.

उत्पादन घटल्याचा परिणाम
​​मुंबई एपीएमसीमध्ये दररोज साधारण ५० जातींच्या तांदळाची आवक होते, ज्यातील २५ जातींना मोठी मागणी असते. जून २०२१ मध्ये बासमतीचे भाव ५५ ते १०० रुपये किलो होते, जे सप्टेंबर २०२३ पासून वाढून ११० रुपयांपर्यंत पोहोचले होते. ही भाववाढ आजही कायम असल्याने सामान्य जनतेच्या घरगुती बजेटवर याचा मोठा परिणाम झाला आहे. उत्पादन घटल्यामुळे निर्माण झालेली ही स्थिती येणाऱ्या काळात तांदळाचे भाव आणखी स्थिर ठेवणार की वाढवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Mumbai: तिसऱ्या मुंबईला ग्रीनफिल्डचा बुस्टर, नवी मुंबई ते पुणे नव्या एक्सप्रेसवेचा मोठा लाभ होणार; काय आहे प्रकल्प ?

Ichalkaranji IPL Betting : ऑनलाईन ‘आयपीएल’ सट्टेबाजी, झटपट पैशाचा नाद इचलकरंजीतील तरूणांचा कारनामा, ५८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT