मुंबई

पाणीटंचाईने भाविकांची गैरसोय

CD

पाणीटंचाईने भाविकांची गैरसोय
महालक्ष्मी यात्रेत टँकरने पाणीपुरवठा
कासा, ता. १० (बातमीदार)ः विव्हळवेढे येथे आठ दिवसांपासून मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या महालक्ष्मी यात्रेत कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात पाणीटंचाईची समस्या तीव्र आहे. त्यामुळे यात्रेसाठी आलेले भाविक, शेकडो दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महालक्ष्मी विव्हळवेढे ग्रामपंचायत हद्दीत विहिरी, कुपनलिका मोठ्या प्रमाणात आहेत. एप्रिल-मेमध्ये दरवर्षी पाण्याची पातळी खोलवर जात असल्याने पाण्याची टंचाई तीव्र झाली आहे. प्रशासनातर्फे विहिरी, कुपनलिका साफसफाईचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने पुरवठा अपुरा ठरत आहे.
------------------------------
चारोटीतून वाहतूक
महालक्ष्मी मंदिर ट्रस्टतर्फे दररोज टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे दुकानदार, भाविकांनी सांगितले. पण अन्न बनवणे, अंघोळ तसेच इतर दैनंदिन गरजांसाठी टँकरचे पाणी अपुरे पडत असल्याने चारोटी परिसरातून पाणी आणावे लागत आहे.
----------------------
कालव्यातील पाण्याचा वापर
महालक्ष्मीतील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तसेच मंदिराच्या शेजारी असणारा मोठा तलावदेखील कोरडा पडला आहे. त्यामुळे चारोटीतील कालव्यातील पाण्याचा वापर करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने, महालक्ष्मी ट्रस्टने प्रयत्न करावेत, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
-------------------------
एप्रिल-मेमध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खाली जाते. अनेक कूपनलिका कोरड्या पडल्या असून, उपलब्ध स्रोतांवर ताण वाढला आहे. वाढती गर्दी लक्षात घेता ट्रस्टतर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.
- संतोष देशमुख, पदाधिकारी, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT