सूत्रकार येथे सोलर पॅनेलचे लोकार्पण
तलासरी, ता. १० (बातमीदार) : तलासरी तालुक्यातील सूत्रकार येथे गुरुवारी (ता. ९) डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या स्वखर्चातून सोलर पॅनेल बसविण्याचा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे स्थानिक महिला बचत गटांना आणि ग्रामसंघांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या सोलर पॅनेलच्या माध्यमातून पत्रावळी बनवण्याची मशीन, पापड मशीन तसेच पीठ गिरणी चालवण्यात येणार असून, त्यामुळे महिलांना स्वयंपूर्णतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकता येणार आहे. विशेषतः आरती महिला ग्रामसंघ व गावातील विविध बचत गटांना याचा थेट फायदा होणार असून, त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे विजेवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यावरणपूरक ऊर्जा वापरास प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास हातभार लागणार आहे.
या कार्यक्रमाला सरपंच माधुरी, उपसरपंच चंद्रकांत दुमाडा, कवाड सरपंच दर्शना बोदले, ग्रामसंघ अध्यक्षा माधुरी वाडू तसेच बचत गटाच्या सदस्या आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत आमदार निकोले यांचे आभार व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.