बोगस पटसंख्येला लगाम
शिक्षण विभागामार्फत कारवाईचा बडगा
पालघर, ता. १० ः जिल्ह्यात काही शाळा पटसंख्येचा फुगवटा करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षण विभागामार्फत व्यापक पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत बोगस पटसंख्या दाखवणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागामार्फत कारवाई केली जाणार आहे.
पालघर जिल्ह्यामधील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात पटसंख्या असल्याचे दाखवण्यात येते. मात्र, कागदोपत्री ही संख्या फुगवली गेल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या. सरकारी योजनांच्या लाभासाठी, शिक्षकांची पदसंख्या कायम राहावी, यासाठी असे प्रकार होत असल्याचा संशय आहे. या प्रकाराविरोधात पडताळणी, भेटी देण्याचे फर्मान जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार तंत्रज्ञानआधारित, पारदर्शक पडताळणी मोहिमेत शिक्षकांना दररोज ऑनलाइन उपस्थिती नोंदवण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे, तर उपस्थित विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी स्टुडन्ट पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. त्यामुळे प्रत्यक्षातील पटसंख्या कळू शकणार आहे.
----------------------
शैक्षणिक गुणवत्ता तपासणार
जिल्ह्यामधील शाळांमध्ये केवळ उपस्थिती तपासली जाणार नसून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासणीही केली जाणार आहे. इयत्ता दुसरी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठीचे वेळापत्रक तयार केले आहे. ११ एप्रिल रोजी मराठी, १५ एप्रिल रोजी गणित, भौतिकशास्त्र तर २२ एप्रिल रोजी इंग्रजी विषयांची गुणवत्ता तपासली जाणार आहे.
---------------------------
जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळानिहाय तपासणीस गुणवत्ता तपासणीचे नियोजन करून स्टुडन्ट पोर्टलवर माहिती नोंदवणे बंधनकारक केले आहे.
- अशोक पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.