फेरीवाला समितीवर शिक्कामोर्तब
नगरविकास विभागाची अधिसूचना जारी
भाईंदर, ता.१० (बातमीदार): मिरा-भाईंदर पालिकेच्या फेरीवाला समिती सदस्यांची नावे नगरविकास विभागाने अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे समितीला तब्बल आठ महिन्यांनी राज्य सरकारकडून मान्यता मिळाली असून फेरीवाला धोरण निश्चितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेने दोन वर्षांपूर्वी फेरीवाला समिती स्थापन करण्यासाठी सर्वेक्षण केले. त्यानंतर ३० मे रोजी फेरीवाला संघटनांमधून निवडणुकीद्वारे समितीवर बारा सदस्य नियुक्त केले. ऑगस्टमध्ये आयुक्तांनी नियुक्त सदस्यांचीही निवड झाली. या सर्व सदस्यांची नावे मान्यतेसाठी नगर विकास विभागाला पाठवली होती. अखेर ७ एप्रिलला समिती सदस्यांच्या नावांची अधिसूचना जारी करण्यात आल्याने अधिकृतपणे समिती अस्तित्वात आली आहे.
-----------------------
समितीचे फायदे
फेरीवाल्यांवर नियंत्रणासाठी पालिकेकडून धोरण निश्चित होणे आवश्यक आहे. फेरीवाला समितीला याबाबतचे धोरण निश्चित करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शहरात फेरीवाला, ना फेरीवाला क्षेत्र निश्चित होणार आहे. तसेच अधिकृत फेरीवाल्यांना परवाने देऊन व्यवसायासाठी जागा दिली जाणार असून या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी व्यवसाय करण्यास मनाई केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.