मुंबई

३५ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

CD

शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव
पालघर तालुक्यातील ३५ शिक्षकांचा सन्मान
मनोर, ता.१० ः पालघर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा आमदार राजेंद्र गावित यांच्याहस्ते ३५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. पालघर तालुक्यातील ४०३ शाळांमध्ये कार्यरत असलेल्या ८५२ शिक्षकांमधून निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली.
पंचायत समिती स्तरावर दरवर्षी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधून केंद्रनिहाय एका शिक्षकाची निवड करून त्यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. पुरस्कारासाठी ३५ शिक्षक, एका गटसाधना केंद्रावरील कर्मचाऱ्याची निवड करण्यात आली. गुरुवारी दुपारी पालघर पूर्वेतील सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक सभागृहात हा सोहळा उत्साहात पार पडला. पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये तसेच गटशिक्षणाधिकारी संजय सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
------------------------
महिला शिक्षकांची संख्या लक्षणीय
पारगाव, सफाळे, केळवरोड, बोईसर, उमरोळी, आगारवाडी, मनोर, दुर्वेस, सोमटे, नवली, मासवण, तारापूर केंद्रांमधील ३५ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रातून निवड झालेल्या शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचे उपक्रम, तसेच नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीमुळे विशेष ठसा उमटवला आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये महिला शिक्षकांची संख्या लक्षणीय होती.
-------------------------
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पुरस्कारांमुळे शिक्षकांना अधिक प्रेरणा मिळून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.
- राजेंद्र गावित, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT