सायन्सको कंपनीतील कामगारांना पगारवाढ
इतर सुविधांसह तीन वर्षांसाठी वेतन करार
रोहा, ता.१० (बातमीदार) : धाटाव एमआयडीसीतील सायन्सको कंपनीतील कामगारांना पुढील तीन वर्षांसाठी नेट १५,२०० रुपयांची भरघोस पगारवाढ मंजूर करण्यात आली आहे. जनरल मजदूर सभा, ठाणे या मान्यताप्राप्त संघटनेच्या नेतृत्वाखाली हा सलग दहावा वेतन करार यशस्वीपणे करण्यात आला.
या करारानुसार कामगारांना वेतनवाढीसोबतच ३,५०० रुपयांच्या इतर सुविधाही मिळणार असून हा करार सर्व सभासदांना लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा करार यशस्वी करण्यासाठी संजय वढावकर, संज्योत वढावकर, शामकांत जोशी, जगदीश उपाध्याय आणि सुहास खरीवले यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच कामगार कमिटीतील तुषार देशमुख, मनीष साळवी, प्रशांत कचरे, सुशील वारगे व वैभव मुंढे यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. कंपनीतर्फे हर्षल भट व विजय चौगुले यांनी सहकार्य केले.
फोटो कॅप्शन :सायन्सको कंपनीतील कामगारांच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करताना कामगार संघटनेचे सचिव संजय वाढवकर व इतर पदाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.