पालघर नगर परिषद सभेच्या थेट प्रक्षेपणाची मागणी
प्रक्षेपण बंद केल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
पालघर, ता. १० (बातमीदार) : पालघर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी नगर परिषदेच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यवर्गाकडून होत आहे. माजी नगराध्यक्ष डॉ. उज्वला काळे यांच्या कार्यकाळात सुरू असलेले सभेचे थेट प्रक्षेपण सध्या बंद करण्यात आले असून, त्यामुळे नगर परिषदेच्या कामकाजातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सध्याचे आरोग्य सभापती अमोल पाटील यांनी याबाबत वारंवार पत्रव्यवहार आणि मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. थेट प्रक्षेपण न झाल्यास नगर परिषदेचा कारभार नागरिकांना समजणार कसा, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच, नगर परिषदेच्या संपूर्ण सभागृहाच्या सदस्यवर्गाची या प्रक्षेपणाची मागणी आहे. मात्र, प्रक्षेपण केले जात नसल्याने सदस्यवर्गातही नाराजी आहे. सभेमध्ये घेतले जाणारे निर्णय, चर्चा आणि नागरिकांशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नसल्याने लोकशाही प्रक्रियेला धक्का बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नगर परिषदेच्या सभांमधील घडामोडी, स्थानिक समस्या आणि त्यावर होणाऱ्या चर्चा नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी नेमके कोणते प्रश्न मांडले, कोणते निर्णय घेतले हे मतदारांना कळले पाहिजे. अन्यथा नागरिकांचा विश्वास कमी होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, थेट प्रक्षेपण पुन्हा सुरू करावे, अशी मागणी आता अधिक तीव्र होत असून, पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनासाठी थेट प्रक्षेपण गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. अमोल पाटील, बांधकाम सभापती चंद्रशेखर वडे, भाजपचे गटनेते भावानंद संखे, शिवसेना गटनेत्या डॉ. उज्वला काळे आणि नगरसेवक यांनी नगर परिषदेकडे सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण पुन्हा सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.