मुंबई

समाधान शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद

CD

समाधान शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद
अनेकांना विविध दाखले प्रदान

कासा, ता. १० (बातमीदार) : महसूल विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ कासा येथे शुक्रवारी (ता. १०) झाले. येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नियोजित शिबिरात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले.

ग्रामीण व दुर्गम भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिलांना महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी तालुका कार्यालयात वारंवार जावे लागू नये, त्यांचा वेळ, पैसा व श्रम वाचावेत, या उद्देशाने मंडळ स्तरावर या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा बळकट करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, तळागाळातील घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचा यामागील मुख्य हेतू आहे.

या वेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, नायब तहसीलदार सीमा पुजारी, कासा पोलिस अधिकारी अमर पाटील, सरपंच सुनीता कामडी, उपसरपंच हरेश मुकणे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष देशमुख, माजी समाज कल्याण सभापती पांडुरंग बेलकर यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विभाग, भूमी अभिलेख, महसूल विभाग, बालविकास विभाग या विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात निवासी दाखले, जात प्रमाणपत्रे, रेशन कार्ड, सातबारा उतारे, नाव नोंदणी आदी विविध कामे एकाच ठिकाणी करण्यात आली. तसेच काही लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: भाजप-IT सेल भारतीय, बाकी पाकिस्तानी? हिंदू-मुस्लिम करून नोकऱ्या मिळत नाहीत; अभिजित दिपकेंची सरकारवर टीका

India-Nepal Dispute: सीमा वादावर नेपाळचा मवाळ सूर! भारताविरोधात संघर्ष नव्हे, संवाद हवा, परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

IND vs AFG Test, 2nd Day: भारताच्या साडेपाचशे धावा अन् अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत; पदार्पणवीर मानव सुतार चमकला

Maratha Reservation: मराठा आंदोलनातील ५६ गुन्हे मागे; राज्य सरकारने पुन्हा मागविली पोलिसांकडून माहिती, जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर हालचाली

Crime: लग्नाआधीच वधू पळाली, नंतर बहीणीसोबत लग्न ठरवलं; पण तिचं भलतंच सत्य समोर येताच वर संतापला अन्... थरारक घटनेनं मंडपात खळबळ

SCROLL FOR NEXT