मुंबई

आरे कॉलनीत ‘मशरूम क्रांती’ची सुरुवात

CD

आरे कॉलनीत ‘मशरूम क्रांती’ची सुरुवात

जोगेश्‍वरी, ता. १० (बातमीदार) : आरे कॉलनी परिसरात आरोग्य, पोषण आणि उद्योजकतेचा संगम घडवणारा एक अभिनव उपक्रम सुरू झाला असून, ‘आरे वसुंधरा’तर्फे ‘दा मशरूम नर्सरी एक्सपिरीयन्स सेंटर’चे भव्य उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामुळे शहरातील नागरिकांसह तरुणांना मशरूम शेती आणि त्यातील व्यवसायाच्या नव्या संधींचा मार्ग खुला झाला आहे.

मशरूम हे केवळ हॉटेलमधील भाजीपुरते मर्यादित नसून ते एक पौष्टिक ‘सुपरफूड’ म्हणून ओळखले जाते. या केंद्रामध्ये विविध प्रकारच्या मशरूम जातींचे प्रात्यक्षिक, त्यांचे आरोग्यदायी फायदे तसेच मशरूमपासून तयार होणारी बिस्किट्स, पावडर यासारखी उत्पादने प्रत्यक्ष पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाची संकल्पना स्वप्नील मोरे यांनी मांडली असून, ‘कल्टीवेटर ग्रोथ मीट’च्या माध्यमातून शेकडो तरुणांना मशरूम शेतीचे प्रशिक्षण आणि व्यवसाय उभारणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास आरे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सेंटरमध्ये मशरूम शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्याचे मार्ग, तसेच तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळत असल्याने युवक-युवतींसाठी ही मोठी संधी ठरत आहे. आरे वसुंधरा, गट क्र. ५ नर्सरी, आरे कॉलनी, गोरेगाव (पूर्व) येथे सुरू झालेले हे केंद्र दररोज सकाळी ११ ते संध्याकाळी सात या वेळेत नागरिकांसाठी खुले असणार असल्याची माहिती आरे वसुंधरेच्या व्यवस्थापनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

सरकारी जमिनींवर आता शेती करता येणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण फक्त एकाच अटीवर, कोणती?

SRH vs RR PL 2026: १६ चेंडूंत फिफ्टी! वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला आयपीएल इतिहासातील Baby Boss

Maharashtra SET Exam : महाराष्ट्र-गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी SET परीक्षा २६ जुलैला; अर्ज प्रक्रिया २ जूनपासून ऑनलाइन सुरू

TET Exam: टीईटी परीक्षेसाठी कमी संख्या असलेल्या माध्यमाच्या उमेदवारांची परीक्षा केंद्र निश्चित

SCROLL FOR NEXT