मुंबई

अपहरणानंतर सुखरूप परतला चिमुकला

CD

अपहरणानंतर सुखरूप परतला चिमुकला
कुर्ला स्थानकावर लागला शोध
कळवा, ता. १० (बातमीदार) : कळवा पूर्व येथील शांतीनगर परिसरातून अपहरण झालेल्या साडेतीन वर्षांच्या मुलाचा कुर्ला रेल्वे स्थानकावर शोध लागला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत मुलाला पालकांच्या स्वाधीन केले. रहेमान उर्फ रोशन इम्रान शेख असे या मुलाचे नाव असून, याप्रकरणी कळवा पोलिस अज्ञात अपहरणकर्त्याचा शोध घेत आहेत.
मंगळवारी (ता. ७) सायंकाळी शांतीनगर झोपडपट्टीत खेळत असताना अज्ञात व्यक्तीने रहेमानचे अपहरण केले होते. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलिस आयुक्त प्रिया ढमाले व वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासोबतच रेल्वे सुरक्षा दलाच्या ग्रुपवर मुलाचे फोटो तातडीने शेअर केले.
रेल्वे पोलिसांनी मुलाचा फोटो ओळखला आणि तो कुर्ला रेल्वे स्थानकावर सापडल्याची माहिती कळवा पोलिसांना दिली. नियमानुसार, मुलाला मानखुर्द येथील बालसुधार केंद्रात ठेवण्यात आले होते. कळवा पोलिसांनी पालकांसह तिथे जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि रहेमानला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले.

तपास सुरू
मुलाला सुखरूप शोधण्यात यश आले असले, तरी त्याला कळव्यातून कुर्ल्यापर्यंत कोणी नेले, याचा शोध पोलिस घेत आहेत. अज्ञात अपहरणकर्त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक नावडे यांनी सांगितले. हरवलेला मुलगा सुखरूप परतल्याने शेख कुटुंबाने पोलिसांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Brijesh Sharma? मजुराचा मुलगा, बूट घेण्याचेही नव्हते पैसे अन् आज विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी झालाय सज्ज...

Mumbai News : खाडी तणावातही मुंबईची गती कायम! गॅस टंचाईच्या भीतीला छेद; मेल-एक्सप्रेस प्रवाशांत दीड टक्के वाढ!

Mumbai Crime: औषध आणण्यासाठी मेडिकल गेले; पण वादाला तोंड फुटलं अन्..., वृद्ध दांपत्यासोबत टोळक्याचं धक्कादायक कृत्य

Eknath Shinde : 'उद्धव ठाकरेंच्या खासदारांची गुप्त बैठक घेण्याचा प्रश्नच नाही'; एकनाथ शिंदेंनी 'ऑपरेशन टायगर'चा एका वाक्यात कंडका पाडला

Sarpanch Santosh Deshmukh: स्व. संतोष देशमुख यांच्या घरात चोरी; एकाच रात्रीत सहा घरं फोडली

SCROLL FOR NEXT