मुंबई

नागरी समस्यांवर तातडीच्या कार्यवाहीची मागणी

CD

नागरी समस्यांवर तातडीच्या कार्यवाहीची मागणी
ॲड. अमोल मातेले यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन

घाटकोपर, ता. १० (बातमीदार) : घाटकोपर (पूर्व) येथील ‘एन’ विभागात नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध नागरी सुविधा व पायाभूत समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी सहाय्यक आयुक्त मारुती पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी नागरिकांच्या वतीने विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

ॲड. मातेले यांनी सादर केलेल्या निवेदनात अनेक महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. पारशीवाडी गणेश मैदान शेजारील समाजकल्याण केंद्रास स्व. कै. पां. रा. कदम समाजकल्याण केंद्र असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच अण्णाभाऊ साठे मैदान परिसरातील गटारांना व्यवस्थित जोडून सांडपाणी व्यवस्थापन सुरळीत करावे, अशी मागणीही करण्यात आली.

सम्राट अशोक बुद्धविहार परिसरात कचरा डब्ब्यांची संख्या वाढवून नियमित स्वच्छता राखावी, तसेच दत्तकवस्ती संस्थेकडील युनिट वाटपातील अनियमिततेची चौकशी करून पारदर्शकता सुनिश्चित करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सोनिया गांधीनगर (भंगार गल्ली) येथे नवीन ड्रेनेज लाइन टाकून समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय अण्णाभाऊ साठे मैदानासमोरील सार्वजनिक शौचालयाचे नूतनीकरण, संबंधित भागात सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे बांधकाम, कन्नड बाग येथील प्रलंबित सार्वजनिक शौचालयाचे काम तातडीने सुरू करणे, तसेच जन्मदाखले मिळण्यात होणारा विलंब दूर करणे, या मागण्याही करण्यात आल्या. यावर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs RCB Live : Proud Of You... मजुराच्या पोरानं बंगळुरूला दिले धक्के, दिग्गजांना बाद केले अन् ९४ धावांत ६ फलंदाज तंबूत पाठवले

Mumbai News : जीवा शिवाचं नातं उलगडणाऱ्या 'निळाई'तील कविता आत्मशोधाचा प्रवास दाखवतात; ज्येष्ठ कवयित्री डॉ. मिनाक्षी पाटील यांचे गौरवोद्गगार

RR vs RCB Live : रियान परागला दुर्बुद्धि सुचली अन् विराट कोहलीला 'Golden Duck'वर माघारी पाठवण्याची संधी हुकली, जोफ्रा आर्चर संतापला, पण रवी बिश्नोईने 'दांडा' उडवला

Mumbai News : खाडी तणावातही मुंबईची गती कायम! गॅस टंचाईच्या भीतीला छेद; मेल-एक्सप्रेस प्रवाशांत दीड टक्के वाढ!

Who is Brijesh Sharma? मजुराचा मुलगा, बूट घेण्याचेही नव्हते पैसे अन् आज विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी झालाय सज्ज...

SCROLL FOR NEXT