मुंबई

ठाणे अजित पवार गट भाकरी फिरवणार

CD

ठाणे राष्ट्रवादीत ‘भाकरी फिरली’
अजित पवारांच्या निधनानंतर सर्व कमिट्या बरखास्त; नजीब मुल्लांचा निर्णय
ठाणे, ता. १० : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनानंतर ठाणे जिल्ह्यातील पक्षात मोठी संघटनात्मक उलथापालथ झाली आहे. पक्षात सुरू असलेली अस्वस्थता आणि कार्यकर्त्यांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी कठोर पाऊल उचलत शहर जिल्हा कमिटीसह सर्व सेल बरखास्त केले आहेत. ‘भाकरी फिरवून’ नव्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्षाला नवसंजीवनी देण्याचा निर्धार या निमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या एका बैठकीत नजीब मुल्ला यांनी पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. अजितदादांच्या निधनानंतर पक्ष मोठ्या धक्क्यात असून, अनेक पदाधिकारी द्विधा मनस्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर मुल्ला यांनी स्पष्ट केले की, ज्यांना पक्ष सोडून इतर ठिकाणी जायचे आहे, त्यांनी निसंकोचपणे जावे. सध्या पक्षाकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही, तरीही जे सोबत राहतील त्यांना पूर्ण ताकदीने सांभाळून घेतले जाईल, असे भावनिक आवाहनही त्यांनी या वेळी केले.

नव्या चेहऱ्यांना संधी
केवळ मुख्य कार्यकारिणीच नव्हे, तर महिला आघाडी, युवा आघाडी आणि इतर सर्व कमिट्या तत्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात आल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्या दमाच्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना समित्यांमध्ये महत्त्वाचे स्थान दिले जाणार आहे. जुन्या आणि अनुभवी पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर पक्षाने आता सल्लागार किंवा इतर विशेष जबाबदाऱ्या सोपवण्याचे संकेत दिले आहेत.

पक्षात पोकळी
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ठाण्यातून मोठा गट त्यांच्यासोबत सामील झाला होता. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाचे नऊ नगरसेवक स्वबळावर निवडून आले होते; मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची पकड सैल होऊ लागली आहे. ही गळती रोखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुंकण्यासाठी संघटनात्मक फेरबदलाचा हा ‘सर्जिकल स्ट्राइक’ केल्याचे बोलले जात आहे.

पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी आम्ही सर्व कमिट्या बरखास्त केल्या आहेत. जे संकटाच्या काळात पक्षासोबत राहतील, त्यांना सोबत घेऊन आम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करू. लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल.
- नजीब मुल्ला, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Brijesh Sharma? मजुराचा मुलगा, बूट घेण्याचेही नव्हते पैसे अन् आज विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी झालाय सज्ज...

Mumbai News : खाडी तणावातही मुंबईची गती कायम! गॅस टंचाईच्या भीतीला छेद; मेल-एक्सप्रेस प्रवाशांत दीड टक्के वाढ!

Mumbai Crime: औषध आणण्यासाठी मेडिकल गेले; पण वादाला तोंड फुटलं अन्..., वृद्ध दांपत्यासोबत टोळक्याचं धक्कादायक कृत्य

Eknath Shinde : 'उद्धव ठाकरेंच्या खासदारांची गुप्त बैठक घेण्याचा प्रश्नच नाही'; एकनाथ शिंदेंनी 'ऑपरेशन टायगर'चा एका वाक्यात कंडका पाडला

Sarpanch Santosh Deshmukh: स्व. संतोष देशमुख यांच्या घरात चोरी; एकाच रात्रीत सहा घरं फोडली

SCROLL FOR NEXT