मुंबई

आर्थर रोडचे '' पॅपीलॉन '' प्रवेशद्वारावरच चतुर्भूज

CD

‘पॅपीलॉन’ची धरपकड
आर्थर रोड कारागृहात अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रयत्न

जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः कारागृहात क्षमतेपेक्षा तिप्पट कैदी असलेल्या मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयातून परतणाऱ्या कैद्यांकडून अमली पदार्थ, नशेसाठी वापर होणाऱ्या औषधी गोळ्यांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारांमुळे अधीक्षकांपासून शिपायांना लेखक हेन्री शेरियर यांच्या ‘पॅपीलॉन’ची आठवण येत आहे.
७०च्या दशकात शेरियर यांचे पॅपीलॉन प्रकाशित झाले. पुस्तकातील नायक पॅपीलॉनची न केलेल्या गुन्ह्यातील अटक, आजन्म कारावासाची शिक्षा, कारागृहातून निसटण्यासाठीची धडपड, त्यासाठी केलेली तर्कसंगत आखणी, शरीरात दडवून आणलेली आवश्यक वा गरजेची सामग्री, आलेले अपयश, यशस्वी होताच नव्याने सुरू केलेले आयुष्य अशा रोमांचकारी प्रवासाचे वर्णन आहे. कारागृहाच्या भिंती भेदण्यासाठी पॅपीलॉन सेलच्या आकाराची डबी (चार्जर) शरीरात दडवून त्याद्वारे वस्तू आत आणतो. अशाच प्रकारच्या तस्करीचे प्रयत्न आर्थर रोडमधील कैदी गांजा, नेट्रावेट १० या औषधी गोळ्या आणण्यासाठी करीत आहेत.
------------------------
गुप्त माहितीचा आधार
विमानतळ किंवा अन्य संवेदनशील शासकीय आस्थापनांप्रमाणे कारागृहात बॉडी स्कॅनर नाही. कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर निव्वळ अनुभवावर झाडाझडती होते. हजारो कैदी असले तरी त्यांचा स्वभाव, प्रवृत्ती, पार्श्वभूमी माहीत असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे एखाद्या कैद्याच्या देहबोलीतील हलका बदल पकडण्याचे कसब आहे. न्यायालयातून कारागृहात परतलेल्या प्रत्येक कैद्याची कॉलर, बाह्या, केसांची तपासणी केली जाते. कैद्यांमध्ये असलेल्या खबऱ्यांकरवी न्यायालयात गेलेल्या कोणत्याही आरोपीची बित्तंबातमी पोलिसांना मिळते.
------------------------
प्रलोभनाचे बळी
कारागृहातील ३५ टक्के कैदी अमली पदार्थांचे सेवन, विक्रीचा किंवा संबंधित गुन्ह्यात अटक झालेले आहेत. यातील काही स्वतःसाठी तर काही विक्रीच्या इराद्याने तस्करीचा प्रयत्न करतात. अनेकदा हलाखीची परिस्थिती असलेल्या कैद्याला पैशांचे, जामिनाच्या सोयीचे प्रलोभन दाखवले जाते किंवा बळजबरी केली जाते.
------------------------
घटनांची नोंद
चार दिवसांपूर्वी कृष्णा नावाचा आरोपी सुनावणीनंतर कारागृहात आला. मुख्य प्रवेशद्वरावरच त्याची विशेष झाडाझडती घेण्यात आली. शौचालयात नेऊन त्याच्या शरीरातून गांजा भरलेल्या सात ते आठ कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. अलीकडच्या काळात कुलाबा पोलिस ठाण्यात अशा प्रकारचे तस्करीचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
------------------------
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
प्रवेशद्वारावर हेतुपुरस्सर अनुभवी, चलाख अधिकारी, अंमलदारांची नियुक्ती केली जाते, कारण बाहेरून आलेला कैदी ब्लेडसारखे घातक शस्त्र, कोकेन आदी रासायनिक अमली पदार्थ किंवा स्फोटकांचा साठा नेण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याद्वारे कारागृहातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, आर्थिक व्यवहारातून होणारी टोळीयुद्धे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याचा कायम धोका असतो, अशी माहिती कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs RCB Live : Proud Of You... मजुराच्या पोरानं बंगळुरूला दिले धक्के, दिग्गजांना बाद केले अन् ९४ धावांत ६ फलंदाज तंबूत पाठवले

Mumbai News : जीवा शिवाचं नातं उलगडणाऱ्या 'निळाई'तील कविता आत्मशोधाचा प्रवास दाखवतात; ज्येष्ठ कवयित्री डॉ. मिनाक्षी पाटील यांचे गौरवोद्गगार

RR vs RCB Live : रियान परागला दुर्बुद्धि सुचली अन् विराट कोहलीला 'Golden Duck'वर माघारी पाठवण्याची संधी हुकली, जोफ्रा आर्चर संतापला, पण रवी बिश्नोईने 'दांडा' उडवला

Mumbai News : खाडी तणावातही मुंबईची गती कायम! गॅस टंचाईच्या भीतीला छेद; मेल-एक्सप्रेस प्रवाशांत दीड टक्के वाढ!

Who is Brijesh Sharma? मजुराचा मुलगा, बूट घेण्याचेही नव्हते पैसे अन् आज विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी झालाय सज्ज...

SCROLL FOR NEXT