ठाणे : ब्रह्मांड परिसरात मॉर्निंग वॉकदरम्यान २२ जानेवारी २०१५ मध्ये सत्यभामा नायर (वय ६१) यांची सोनसाखळी चोरीला गेली होती. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान पोलिसांनी ही सोनसाखळी हस्तगत केली होती; मात्र फिर्यादींचा पत्ता बदलल्याने मुद्देमाल परत देणे शक्य झाले नव्हते. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार प्रलंबित मुद्देमाल संबंधितांना परत करण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्देमाल कक्षातील महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुशीला चेडे व पोलिस हवालदार मनोज सपकाळ यांनी फिर्यादींचा शोध घेतला. न्यायालयीन आदेश प्राप्त करून १६ ग्रॅम वजनाची सोनसाखळी दहा वर्षांनंतर नायर यांना परत केली. पोलिसांकडून अचानक संपर्क साधून सोनसाखळी परत मिळाल्याने नायर यांनी आश्चर्य व्यक्त करत कासारवडवली पोलिस ठाणे पोलिसांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.