बेलापुरात ध्वनिप्रदूषणात वाढ
आवाज प्रतिबंधक भिंतींची नागरिकांची मागणी
नेरूळ, ता. १० (बातमीदार) : सायन-पनवेल महामार्गावरील सीबीडी बेलापूर परिसरात वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले असून, उड्डाणपुलांवर आवाज प्रतिबंधक भिंती उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजप प्रणीत नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे सरचिटणीस विनय मोरे यांनी याबाबत प्रशासनाकडे निवेदन दिले आहे.
सीबीडी बेलापूर परिसरातून मुंबई, ठाणे ते पुणे यादरम्यान मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. परिणामी येथे ध्वनिप्रदूषणाची पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक झाल्याचे निदर्शनास आले आहे. या आवाजाचा थेट परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना झोपेच्या समस्या, मानसिक तणाव तसेच श्रवणविकारांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील एकाग्रतेवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे उड्डाणपुलांवर किमान एक किलोमीटर लांबीच्या आणि सुमारे सहा मीटर उंचीच्या ध्वनिरोधक भिंती तातडीने उभाराव्यात, अशी मागणी विनय मोरे यांनी केली आहे.
चौकट :
तातडीच्या उपाययोजनांची गरज
नागरिकांना सतत खिडक्या-दारे बंद ठेवावी लागत असल्याने नैसर्गिक वायुवीजनावर परिणाम होत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.