मुंबई

निवडणूक खर्चावरून २८ उमेदवार अडचणीत

CD

भिवंडी, ता. १० (बातमीदार) : भिवंडी महापालिकेची १५ जानेवारीला झालेली सार्वत्रिक निवडणूक संपल्यानंतर उमेदवारांनी एक महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, २८ उमेदवारांनी अद्याप हिशेब सादर न केल्याने निवडणूक खर्च तपासणी पथकाने त्यांना नोटीस बजावली असून पुढील कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकीत २३ प्रभागांतील ९० वॉर्डांमध्ये एकूण ४३८ उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. निकालानंतर अनेक उमेदवारांनी आपले खर्च विवरण वेळेत सादर केले. मात्र, निकाल जाहीर होऊन महिन्याहून अधिक कालावधी लोटूनही २८ उमेदवारांनी हिशेब दिला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, या २८ उमेदवारांमध्ये काही प्रमुख उमेदवारांचाही समावेश आहे. पराभवामुळे हिशेब सादर करण्यात टाळाटाळ होत असल्याची चर्चा आहे. तर काही उमेदवार जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचेही सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्च तपासणी पथकप्रमुखांनी संबंधित उमेदवारांना नोटीस पाठविल्या आहेत. नोटीस मिळालेल्यांमध्ये ११ महिला आणि १७ पुरुष उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती पालिकेच्या लेखा विभागातील सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahatma Phule: जन्म द्विशताब्दी वर्षातच फुलेंच्या विचार साहित्याचा शासनाला विसर! शासकीय ग्रंथागारात पुस्तकं उपलब्धच नाहीत; फुले साहित्यप्रेमींचा आंदोलनाचा इशारा

Kumbh Mela Viral Girl Monalisa: मोनालिसा अल्पवयीन असल्याचं तपासात उघड, फरमान खानवर 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा; कुंभमेळ्यात झाली होती व्हायरल

Mumbai News: मेट्रो-१० ला गती; पॉड टॅक्सीचा प्लॅन तयार! मुंबईनंतर 'या' तीन शहरांमध्ये पॉड टॅक्सी सुरू होणार, सरकारचा मोठा निर्णय

Israel Reaction Ceasefire : पुन्हा युद्धाची ठिणगी पडणार! अमेरिका–इराण युद्धविरामावर इस्रायलची तीव्र नाराजी; पाकिस्तानची मध्यस्थी अमान्य, काय आहे इतिहास

Sara Tendulkar Viral Video : कोणाला सपोर्ट करणार, लखनौ की गुजरात? सारा तेंडुलकर गोड हसली अन् तिची प्राईजलेस रिअ‍ॅक्शन, Video

SCROLL FOR NEXT